शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका प्रशासनाचा अजब कारभार : मृत कर्मचाऱ्याला निवडणुकीची ड्युटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 12:13 IST

पाच महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या नगर सचिव विभागातील शिपाई कर्मचाऱ्याला देखील निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४२ अ व ब आणि प्रभाग क्रमांक १(अ) च्या पोटनिवडणूक प्रक्रिया जाहीरयेत्या २३ जून रोजी या तीन जागांसाठी मतदान होणारनगरसचिव विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती कुणाच्या पथ्यावर

पुणे : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४२ अ व ब आणि प्रभाग क्रमांक १(अ) च्या पोटनिवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने कर्मचा-यांची नियुक्ती केली असून, यामध्ये पाच महिन्यांपूर्वी मृत्यु पावलेल्या नगर सचिव विभागातील शिपाई चंद्रकांत रामचंद्र रसाळ कर्मचाऱ्याला देखील निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे. याबाबत तातडीने निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याचे आदेश देखील विभागाने दिले. परंतु, नियुक्ती दिलेली व्यक्तीच हयात नसल्याचे नगर सचिव विभागाने महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाला कळविले आहे.महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी प्रभाग क्रमांक ४२ अ व ब आणि प्रभाग क्रमांक १(अ) च्या पोटनिवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. येत्या २३ जून रोजी या तीन जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या कामांसाठी महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात एकट्या नगरसचिव विभागातील २५ कर्मचा-यांना निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे. यामध्येच या मृत कर्मचाऱ्याचा समावेश आहे. --------------------नगरसचिव विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती कुणाच्या पथ्यावरनगरसचिव विभागातील कर्मचा-यांचा शहरातील सर्व नगरसेवकांसोबत विविध कामा निमित्त थेट संबंध येतो. परंतु याच विभागातील सर्वांधिक सुमारे २५ कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या पोटनिवडणुकीची कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे नगरसचिव विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती या निवडणुकीत नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार हे लवकर स्पष्ट हाईल.-----------सामान्य प्रशासन विभागाच्या सूचीनुसार कर्मचाऱ्यांना नियुक्तीनिवडणुकीच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून यादी मागविण्यात येते. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या यादीच्या आधारे निवडणुकीच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये आमच्या विभागाचा काही दोष नाही.-विजय दहिभाते, उपआयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDeathमृत्यू