शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील धक्कादायक घटना! भरदिवसा सख्ख्या मावस भावाचा ३८ वार करुन खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 20:01 IST

आरोपीला बारामती पोलीसांनी केली अटक

बारामती : बारामती एमआयडीसीतील रुई परीसरात सख्ख्या मावस भावावर वार करीत त्याचा निर्घृण खुन केल्याचा धक्कादायक प्रकार भर दिवसा घडला आहे. गजानन पवार (वय २८,मुळ रा.वसमत,जि.हिंगोली,सध्या रूई बारामती)असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे.

सोमवारी (दि १) दुपारी १२ च्या सुमारास रुई शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील बाजुस गजानन वास्तव्यास आहे. घरातच त्याची हत्या करण्यात आली. गजानन यांचा मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्याने वडीलांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्याने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर ग्रामीण पोलीसांना याबाबत सांगण्यात आले. घटनेचे गांभीर्य पाहून ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हत्या करण्यात आलेल्या युवकावर पोलीसांनी केलेल्या पाहणीत ३८ वार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एवढी भयानक पध्दतीने झालेली हत्या पाहून पोलीस चक्रावले. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली. मात्र कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहित. पोलिसांनी केलेल्या चौकशीत गजानन हा केशकर्तनालयात काम करतो. त्याच्याबरोबर त्याचा मावस भाऊ संतोष गुळमुळे (रा.वसमत,जि.हिंगोली)हा देखील काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचबरोबर तो सतत नशेत असतो,अशी माहिती पोलीसांना मिळाली.पोलिसांनी शोध घेताना संतोष सीसीटीव्ही फुटेजमध्ये येथुन जाताना दिसला. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तातडीने बारामती बसस्थानक, रेल्वे स्थानक, हॉटेल, ढाबे आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पथक पाठवत संतोषला पकडण्यासाठी शोधमोहिम राबविली. पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलीस हवालदार राम कानगुडे, अमोल नरुटे आदींच्या पथकाने संतोषला झडप घालत पकडले. दरम्यान,पोलीसांनी केलेल्या तपासात सख्ख्या मावस भावाचा केवळ राग म्हणुन खुन केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू