शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! टेम्पो चालकाला कोयत्याच्या धाक दाखवून लुबाडले, तर चालकाच्या आईला केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 17:50 IST

गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवून लोकांनाही लावले पळवून

ठळक मुद्देवारजे पोलिसांकडून दोन गुन्हेगार अटकेत

 रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवुन टेम्पोचालकाला लुबाडून चालकाच्या आईलाही मारहाण केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना अटक केली आहे. 

गौरव सुरेश पासलकर (वय २२, रा. वारजे), मंगेश विजय जडीतकर (वय २०, रा. नर्‍हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे  दोन साथीदार पल्या चौधरी आणि राजू गेहलोत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विकास जानावळे (वय २६, रा.वारजे) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना वारजे येथील यश मित्र मंडळ चौकात शनिवारी रात्री ११ वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास जानावळे हा आपल्या आईला घेऊन टेम्पोने जात होता. तेव्हा चौघांनी त्यांना अडवले़. विकास याला टेम्पोतून खाली ओढले. त्याच्या मानेवर कोयता लावून त्याच्याकडील ३ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याच्या आईने पैसे द्यावेत, म्हणून त्यांना दगड मारुन जखमी केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक मदतीसाठी येऊ लागले. तेव्हा त्यांनी लोकांना कोयत्याचा धाक दाखवून पळवून लावले. गौरव आणि मंगेश हे दोघे सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस