शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

TET Exam: पेपरफुटी प्रकरणाबद्दल पुणे पोलिसांचे धक्कादायक खुलासे; आरोपींकडे सापडले ८८ लाख रुपये आणि सोने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 16:02 IST

या पत्रकार परिषदेत बोलताना अमिताभ गुप्ता पुढे म्हणाले, आम्ही दोन पेपरफुटीची प्रकरणं हाताळत होतो, त्यामध्ये प्राथमिकपणे आरोग्य भरतीचा तपास सुरु होता...

पुणेपुणे पोलिसांनी शिक्षक पात्रता परीक्षेत (TET Exam) गैरव्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक केली आहे. या कारवाईनंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी याप्रकऱणी पत्रकार परिषदेत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे याच्यासोबत आणखी एकाला अटक केल्याची माहितीही गुप्ता यांनी दिली. तसेच या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असल्याचेही सांगितले

या पत्रकार परिषदेत बोलताना अमिताभ गुप्ता पुढे म्हणाले, आम्ही दोन पेपरफुटीची प्रकरणं हाताळत होतो, त्यामध्ये प्राथमिकपणे आरोग्य भरतीचा तपास सुरु होता. त्यावेळी आम्हाला MHADA च्या परीक्षेतील गैरव्यवहाराबद्दल माहिती हाती लागली होती. परीक्षा होण्याच्या एक दिवस अगोदर रात्री सर्वांना अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरु असताना TET च्या परीक्षेतही गडबड झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. २०२० वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये ही परीक्षा पार पडली होती. टीईटीच्या परीक्षेत जो काही गैरप्रकार सुरु होता त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. तुकाराम तुपे यांच्यासोबत आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.कारवाईवेळी आरोपींकडे ८८ लाख रुपये रोख, काही सोनं आणि एफडी सापडल्या असल्याची माहितीही गुप्ता यांनी दिली. 

काय होती मोडस ऑपरेंडी –या परीक्षा घेतल्यानंतर काही उमेदवारांना परीक्षेचा बैठक क्रमांक लिहू नका सांगितलं जायचं. स्कॅनिंग करताना तो नंबर लिहिला जायचा. जर कोणी राहिलं असेल तर त्यांना पेपर पुन्हा तपासणीसाठी द्या सांगायचे आणि नंतर त्यात बदल केले जायचे, अशी माहितीही अमिताभ गुप्ता यांनी यावेळी दिली.

पुढे बोलताना गुप्ता म्हणाले, प्रत्येक उमेदवाराकडून ३५ हजार ते १ लाखांपर्यंतची रक्कम घेतली जात होती. आमच्या माहितीप्रमाणे साडे चार कोटी जमा झाले होते असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या ९० लाख जप्त केले आहेत. याप्रकरणी अजून तीन ते चार जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र