शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
2
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
5
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
6
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
7
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
8
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
9
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
10
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
11
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
12
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
13
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
14
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
15
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
16
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
17
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
18
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
19
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
20
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी

धक्कादायक ! छेडछाडीला कंटाळून पीडितेसह आई-वडिलांचे विषप्राशन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 20:50 IST

छेडछाड व मानसिक त्रासामुळे लग्न मोडल्याने १९ वर्षीय मुलीसह तिच्या आईवडिलांनी विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देवडिलांचा मृत्यू : आरोपीने जमलेले लग्नही मोडल्याने निराशा 

राजगुरूनगर (दावडी ) : टोकावडे (ता.खेड) येथे तरुणाकडून होत असलेली छेडछाड व मानसिक त्रासामुळे लग्न मोडल्याने १९ वर्षीय मुलीसह तिच्या आईवडिलांनी विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला असून आई व मुलगी बचावल्या आहेत. गावातील एका युवकाने लग्न करण्याची धमकी देऊन वारंवार पीडित मुलीच्या आई-वडिलांना मानसिक त्रास दिला. तसेच पीडित मुलीचे जमलेले लग्न मोडले. त्यामुळे आई, वडील, मुलगी यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी व आई सुदैवाने बचावल्या आहेत. वडिलांचा उपचारादरम्यान या घटनेत मृत्यू झाला.  खेडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; टोकावडे गावात पीडित मुलगी आई,  वडील व भाऊ एकत्र राहत होते. त्याच गावातील मुलगा नितीन लिंबाजी मुऱ्हे पीडितेची नेहमी छेड काढत होता. पीडित मुलगी या त्रासाला कंटाळली होती. याबाबत १ महिन्यापूर्वी आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी मुऱ्हे याला जाब विचारला होता. त्रास न देण्याबाबत समजावून सांगितले होते. समजूत काढत असतानाही नितिनने पीडित मुलीच्या आई-वडिलांचा शिवीगाळ केली. तुमच्या मुलीचे लग्न माझ्याबरोबर लावून दिले नाही तर तिला पळवून नेईन. तिची व तुमची बदनामी करेन अशी धमकी दिली होती. त्यावेळी पीडित मुलीचे आई-वडील यांनी तुझी पोलिसांत तक्रार करू असे सांगितल्यावर पोलिसात तक्रार केली तर सगळ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेच्या आई-वडिलांनी घाबरून पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली नाही.हा पीडित मुलीला वारंवार त्रास देऊन लग्न करण्यासाठी तिला व आई-वडिलांना धमकी देऊ लागला. त्यामुळे घरातील सर्वजण मानसिक तणावामध्ये होते. पीडित मुलीचे फोटो मोबाईलवर दाखवून बदनामी करेन अशी धमकी नितीन देत होता. दरम्यान पीडित मुलीचे लग्न मुंबई डोंबिवली येथे जमले होते. तेथेही जाऊन तु जर या मुलीशी लग्न केले तर तुझ्या घरच्यांना सोडणार नाही अशी धमकी तिच्या भावी नवऱ्याला दिली व लग्न मोडले. तुमच्या मुलीचे लग्न कुठे जमते तेच पाहतो अशी धमकी दिली. त्यामुळे पीडितेचे कुटुंब मानसिक तणावाखाली होते. तणावातच आई-वडील व मुलगी या तिघांनी विषारी औषध प्राशन केले. औषध पिल्यानंतर हे तिघेही घरात बेशुद्ध पडले. ही बाब लक्षात आल्यानंतर लोकांनी व नातेवाईकांनी त्यांना राजगुरुनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे दोन दिवस उपचार करून त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात नेले. उपचारानंतर आई व पीडित मुलीची प्रकृती व्यवस्थित आहे. 

आरोपीस अटक खेड पोलीस ठाण्यात नितीन मुºहे विरोधात मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा  याच्यावर दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत. 

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू