शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक घटना! आईनेच पोटच्या दोन चिमुकल्यांचा रस्सीने गळा आवळून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 15:52 IST

मुलांचे मृतदेह उंच वाढलेल्या गवत व झाडा झुडपात टाकून ती निघून गेली

पुणे : रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्यांचा रस्सीने गळा आवळून आईनेच खून केला असल्याची घटना मुळशी तालुक्यातल्या शिरवली येथे घडली आहे. पोटच्या मुलांचा निर्दयीपणे खून करून जन्मदाती आई निघून गेली. सदर प्रकाराबाबत तिच्या नवऱ्याने पौडपोलिसांमध्ये तक्रार दिली. हा प्रकार समजताच पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही तासात खुनी आईला पोलिसांनी लोणावळा येथून ताब्यात घेतले.    आरोपीचा पती संजय जगन्नाथ सोलंकी (वय २५ वर्षे, रा. मुळशी ) याने फिर्याद दिली आहे. पौड पोलीसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार ५ जानेवारीला दुपारी आरोपी पूना संजय सोलंकी (वय २४ वर्ष) हिने रागाच्या भरात मोठी मुलगी चंदा संजय सोलंकी (वय ३ वर्षे ६ महिने) व मुलगा आनंद संजय सोलंकी (वय २ वर्षे) यांचा रस्सीने गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलांचे मृतदेह उंच वाढलेल्या गवत व झाडा झुडपात टाकून निघून गेली. या प्रकाराबाबत पौड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पूना हिला लोणावळा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय ढोले यांनी भेट दिली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे करत आहेत. 

टॅग्स :PaudपौडDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक