शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा लावणारा निघाला डॉक्टरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 15:12 IST

एका नामांकित महाविदयालयाशी संलग्न रुग्णालयात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिला डॉक्टरांबाबत घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती.

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या बाथरुम व बेडरुममध्ये स्पाय कॅमेरा लावण्यामध्ये एका डॉक्टराचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी एमडी डॉक्टरला अटक केली आहे.

सुजित आबाजीराव जगताप (वय ४२) असे अटक केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. या डॉक्टरांने स्पाय कॅमेरा बल्ब अमेझॉनवरुन मागवल्याचे तपासात समोर आले आहे. हा प्रकार ६ जुलै रोजी घडला होता. सुजित जगताप हे एमडी आहेत. त्यांचा हिराबाग येथे क्लिनिग आहे. ते भारती विद्यापीठ परिसरात एका हॉस्पिटलमध्ये लेक्चरला गेले होते.

याप्रकरणी एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टराने फिर्याद दिली होती. ही महिला डॉक्‍टर एका नामांकित महाविदयालयाशी संलग्न रुग्णालयात काम करते. ती रुग्णालयाच्या सर्व्हिस क्वार्टरमध्ये आणखी एका महिला डॉक्‍टरसह राहते. ती मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातील काम उरकल्यावर फ्रेश होण्यासाठी रुमवर आली होती. यावेळी तिने बाथरुमची लाईट लावली असता ती सुरु झाली नाही. यानंतर बेडरुमची लाईटही सुरु झाली नाही. त्यामुळे तिने इलेक्ट्रिशिअनला बोलवले. त्याने दुरुस्ती करण्यासाठी बाथरुममधील बल्पचे होल्डर खोकल्यावर, आत स्पाय कॅमेरे, त्याचे मेमरी कार्ड आणि बॅकअप आढळला. यानंतर बेडरुमच्या बल्पचे होल्डर खोलले असता तेथेही असाच प्रकार आढळून आला. यानंतर तिने तातडीने धाव घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना गेल्या ४ दिवसांपासून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तसेच सुरक्षा रक्षक, फिर्यादी यांना संशय वाटत असलेल्यांकडे चौकशी करत होते. दरम्यान एका सीसीटीव्हीमध्ये डॉ. जगताप कैद झाले होते. त्यांना चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी सांगितले की, सुजित जगताप हा न्यूरोलॉजिस्ट आहे. तांत्रिक विश्षलेणाद्वारे पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. आपण हे का केले हे अजूनही तो सांगत नाही.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिसdoctorडॉक्टर