शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
7
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
8
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
9
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
10
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
11
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
12
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
13
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
14
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
15
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
16
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
17
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
18
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
19
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
20
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले

सतीश वाघ खून प्रकरण: नवऱ्याला मारण्यासाठी मोहिनी वाघने जादूटोणा अन् केली होती रेकी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 11:50 IST

दोषारोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड

पुणे -  सतीश वाघ खून प्रकरणात हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे दोषारोपपत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले आहे. यात सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रातून समोर आला आहे.यापूर्वी पुणेपोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केली होती. मोहिनी वाघ सध्या पोलिस कोठडीत आहे. पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची आणि चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.मिळलेल्या माहितीनुसार, लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे दोषारोपपत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले. या दोषारोपत्रानुसार सतीश वाघ यांना जीवे मारण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रातून समोर आला आहे. या दोषारोपपत्रात अक्षय आणि मोहिनीसह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल झाले आहे.कोण आहे ते न बघता कठोर कारवाई करा; बीडच्या घटनेवरून पवारांचे सरकारला आवाहन.दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिनी वाघने सुरुवातीला सतीश वाघ यांचे फक्त हात पाय तोडण्याची सुपारी दिली होती. मात्र मारेकऱ्यांना जेव्हा सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत असे समजले. त्यानंतर त्यांनी त्यांचा खून केला. त्यांच्या शरीरावर तब्बल ७२ वार करण्यात आले होते.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील अनेक वर्षांपासून वाघ पती-पत्नीत वाद होते. सतीश वाघ यांची देखील बाहेर अनैतिक संबंध असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. तर मोहिनी वाघ यांचे देखील अक्षय जावळकर या शेजारीच राहणाऱ्या तरुणासोबत संबंध होते. यावरून वाघ दांपत्यात सतत वाद व्हायचे. सतीश वाघ हे पत्नीला मारहाण करायचे. तर घर खर्चासाठी पैसेही देत नव्हते. यावरून मोहिनी वाघ आतल्या आत धुमसत होत्या. त्यामुळेच त्यांनी सतीश वाघ यांचा काटा काढण्याचा ठरवलं. प्रियकर अक्षय जावळकर याच्या मदतीने तिने पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती.मात्र ही सुपारी फक्त सतीश वाघ यांचे हातपाय तोडून त्यांना अपंग करण्याची होती. हात पाय तुटल्यानंतर तो घरात बसेल, त्यानंतर घरातील सर्व आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात येतील.. आणि आपल्याला त्याला सांभाळता येईल असा विचार म्हणून वाघ हिने केल्याचे चौकशीत समोर आले आहे. आणि त्या दृष्टीने मारेकऱ्यांना देखील सांगत आले होते. मात्र ९ डिसेंबर रोजी पहाटे सतीश वाघ यांची अपहरण झाले आणि त्यानंतर मारेकऱ्यांना सतीश वाघ हे आमदाराचे मामा असल्याचे समजले. आरोपींनी सतीश वाघ यांच्यावर ७२ वार करून संपवले. यापूर्वी, मोहिनी वाघ हिने यापूर्वीही एका व्यक्तीला सतीश वाघ यांना ठार मारण्यासाठी सुपारी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर तिने अक्षय जवळकर यांच्या मदतीनेच संपूर्ण कट रचला आणि अमलात आणला.मोहिनी वाघ हिला पुणे पोलिसांनी अटक केली असून ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणात तिच्याकडे चौकशी सुरू असून या चौकशीतून दररोज धक्कादायक आणि चक्रावणारी माहिती समोर येत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसCourtन्यायालय