शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! महिलेने संमतीने मित्रासोबत केलेल्या शारीरिक संबंधाचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 11:41 IST

आरोपी वकिलाने तसेच त्यांची आशील असलेल्या एका महिलेने बेडरूममध्ये स्पाय कॅमेरा बसविला.

ठळक मुद्देपुण्यातील प्रख्यात वकिलावर गुन्हा दाखल

पिंपरी:  महिलेने मित्रासोबत संमतीने केलेल्या शारीरिक संबंधाचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रण केले. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पसरविण्याची धमकी देऊन मोठ्या रकमेची मागणी केली. याप्रकरणी पुण्यातील प्रख्यात वकील व एका महिलेसह तिघांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथे हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅड. अभिजीत सरवटे, असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी अ‍ॅड. सरवटे याने तसेच त्यांची आशील असलेल्या एका महिलेने बेडरूममध्ये स्पाय कॅमेरा बसविला. त्यासाठी एका जणाची मदत घेतली.फिर्यादी महिलेने तिच्या मित्रासोबत संमतीने केलेल्या शारीरिक संबंधाचे चित्रण करून त्याचे व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरविण्याची फिर्यादी महिलेच्या मित्राला धमकी दिली. फिर्यादीच्या वैयक्तिक जीवनातील खासगी कृत्य चित्रित करून ते पसरवून त्याच्या ओळखीच्या प्रतिष्ठित लोकांना दाखविले. त्यांनी याबाबत फिर्यादी महिलेला सांगितले. तसेच सदरचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरविण्याचे सांगून महिलेच्या मित्राकडून आरोपींनी मोठ्या रकमेची मागणी केली. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एस. गवळी तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसadvocateवकिल