शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! धुणेभांडी करणाऱ्या महिलांना देहविक्री करणार्‍या महिला दाखवून लाटले अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 17:30 IST

कायाकल्प संस्थेच्या ५ जणांना अटक

ठळक मुद्देशासनाच्या योजनेचा घेतला गैरफायदा

पुणे: शासनाने देहविक्री करणार्‍या महिलांना ३ महिन्यांपासून प्रत्येकी ५ हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. कालाकल्प संस्थेतील सभासदांनी सहकारनगर, दत्तवाडी, लक्ष्मीनगरमध्ये धुणेभांडी करणार्‍या महिलांना देहविक्री करणार्‍या महिला दाखवून शासनाचे अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी कायाकल्प संस्थेच्या ३ महिलांसह ५ जणांना अटक केली आहे. शासनाच्या योजनेचा गैरफायदा घेतल्याचा हा प्रकार समोर आला असून खरोखरच वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांपर्यंत हे अनुदान पोहचले का याविषयी शंका उपस्थित झाली आहे. 

गौरी तेजबहाद्दूर गुरुंग (वय ३२, रा. मनाली अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी), सविता अशोक लष्करे (वय २६, रा. यशवंतनगर, येरवडा), सारिका अशोक लष्करे (वय ३०, रा. यशवंतनगर, येरवडा), महेश राजू घडसिंग (वय २६, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, गणेशखिंड रोड) आणि अमोल दत्तात्रय माळी (वय २५, रा. बालाजीनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

याप्रकरणी नायब तहसीलदार प्रकाश व्हटकर यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी, देहविक्री करणार्‍या महिलांना कोरोना काळात उपासमार होऊ नये, म्हणून त्यांचे कोणतेही ओळखपत्र न घेता अनुदान वाटप करण्याचे आदेश दिलेले होते. अशा महिलांची यादी बनविण्याचे काम कायाकल्प संस्था व त्यांचे पदाधिकारी यांना देण्यात आले होते. कायाकल्प संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी देहविक्री करणार्‍या महिलांऐवजी लक्ष्मीनगर, सहकारनगर, दत्तवाडी भागात धुणे भांडी व इतर लहानसहान कामे करणार्‍या गरीब महिलांना कोरोनामध्ये कामधंदा नसल्याने ३ महिन्यांकरीता प्रत्येकी ५ हजार रुपये संस्थेकडून मिळणार असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडून सर्व बँक खात्यांची माहिती घेतली व ती शासनाला या महिला देहविक्री करणार्‍या असल्याचे भासविले. शासनाने त्यांच्या खात्यात २३ एप्रिल रोजी प्रत्येकी ५ हजार रुपये असे १५ हजार रुपये जमा केले. या महिलांच्या खात्यात १५ हजार रुपये जमा झाल्यावर कालाकल्प संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी यातील प्रत्येकी १० हजार रुपये वरिष्ठ अधिकारी व इतर काही अनाथ लोकांना द्यायचे आहेत, असे सांगून त्यांच्याकडून शासकीय निधीतील प्रत्येकी १० हजार रुपये परत घेतले. अशा प्रकारे त्यांनी तब्बल ५२ महिलांकडून प्रत्येकी १० हजार रुपये असे ५ लाख २० हजार रुपयांचा अपहार केला असल्याचे उघडकीस आले आहे. 

असा आला हा प्रकार उघडकीस

या महिलांना कालाकल्प संस्थेने आम्ही पैसे देणार असे सांगून त्यांच्याकडून माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर त्यांच्याकडून त्यातील १० हजार रुपये काढून घेतले. दरम्यान, हे अनुदान आपल्याला नाही तर देहविक्री करणार्‍या महिलांसाठी होते, अशी माहिती अनुदान मिळालेल्या काही महिलांना मिळाली. त्यानंतर त्या महिला तक्रार करण्यासाठी दत्तवाडी पोलिसांकडे गेल्या. दत्तवाडी पोलिसांनी याची माहिती महसुल विभागाला दिली. त्यानंतर नायब तहसिलदार प्रकाश व्हटकर यांनी याची चौकशी केली. त्यांनी अनुदान मिळालेल्या ५२ महिलांना भेटून याची माहिती घेतली. त्यात त्यांची फसवणूक कालाकल्प संस्थेने केलेल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे.                                                                                                                              

नको आम्हाला असले अनुदान

आपल्याला मिळालेले शासनाने अनुदान हे कोरोना काळात कामधंदा नसल्याबद्दल नाही तर देहविक्री करणार्‍या महिलांसाठी असल्याचे समजल्यावर या सर्व महिला संतप्त झाल्या आहेत. आम्ही स्वाभिमानाने काम करुन जगत आहोत, असे काम आम्ही कधी करत नाही. त्यामुळे हे अनुदान आम्हाला नको, उरलेले ५ हजार रुपयेही परत घ्या, अशी मागणी या महिलांकडून केली जात आहे.

जिल्ह्यातील ५ हजार २९६ वेश्या व्यवसाय करणार्‍यांना अनुदान

शासनाने जिल्ह्यातील ५ हजार २९६ वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांना ७ कोटी ९४ लाख ४० हजार रुपये दोन टप्प्यात वितरीत केले आहे. वेश्या व्यवसाय करणार्‍या महिला असल्याचे दाखवून पुण्यातील एकाच भागातील ५२ महिलांना अनुदान देऊन त्याद्वारे फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शासनाने दिलेले अनुदान हे खरोखरच वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांपर्यंत पोहचले का याविषयी शंका उपस्थित झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक