शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक..! ठेकेदारांचे चालक प्रशिक्षणाविना... पीएमपीकडे माहितीही नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 16:18 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून या ठेकेदारांकडील चालकांना नियमितपणे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच वाहन चालक परवाना व बॅचच्या माहितीशिवाय संबंधित चालकाची पुरेशी माहितीही प्रशासनाकडे नाही.

ठळक मुद्देठेकेदारांकडील बसेस प्रमाण पीएमपीच्या मालकीच्या बसेसच्या तुलनेत अधिक प्रत्येकवेळी प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांना सुचना, ताकीद, नोटीस देणे, दंड ठेकेदारांकडील सुमारे ४५० हून अधिक बस दररोज विविध मार्गांवर

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून या ठेकेदारांकडील चालकांना नियमितपणे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच वाहन चालक परवाना व बॅचच्या माहितीशिवाय संबंधित चालकाची पुरेशी माहितीही प्रशासनाकडे नाही. ठेकेदारांनी दिलेल्या माहितीवरच विसंबून राहत प्रशासनाकडून संबंधित चालकांच्या ताब्यात बस दिल्या जातात. या परवाना, बॅचशिवाय इतर बाबींची योग्यप्रकारे पडताळणी करण्याची तसदीही घेतली जात नाही. मद्यधुंद अवस्थेत बस चालवून चालकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याची घटना रविवारी दुपारी कात्रज ते पद्मावती दरम्यान घडली. या घटनेनंतर चालकाला संबंधित ठेकेदाराने कामावरून काढून टाकले. पण पीएमपी प्रशासनाकडून अद्यापपर्यंत ठेकेदाराला सुचना देण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडील चालकांबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. कोणतीही दुर्घटना न घडल्याने या घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. अधूनमधुन पीएमपी बसचे छोटे-मोठे अपघात होतच असतात. त्यामध्ये ठेकेदारांकडील बसेस प्रमाण पीएमपीच्या मालकीच्या बसेसच्या तुलनेत अधिक आहे. प्रत्येकवेळी प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांना सुचना, ताकीद, नोटीस देणे, दंड करण्याशिवाय काहीही केले जात नाही. पीएमपीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदारांकडून आगार प्रमुखांकडे चालकांविषयीची माहिती दिली जाते. त्यामध्ये चालक परवाना, बॅच व अन्य माहिती असते. आगारामध्ये परवाना, बॅचची खातरजमा केली जाते. तसेच संबंधित चालक यापुर्वी पीएमपीच्या सेवेत होता की नाही, असल्यास त्याच्यावर कोणत्याही कारणामुळे कारवाई झालेली असल्यास मान्यता दिली जात नाही. अशा चालकांना पीएमपी प्रशासनाने काळ््या यादीत टाकले आहे. मात्र, इतर चालकांची यापूर्वीचा अनुभव, नोकरीची पुरेशी माहिती घेतली जात नाही. ठेकेदाराने दिलेल्या माहितीवरच विसंबून राहिले जाते. तसेच संबंधित चालकांची माहिती आगार पातळीवरच ठेवली जाते. पीएमपीच्या मुख्यालयामध्ये एकत्रित माहिती उपलब्ध होत नाही. त्याची पडताळणीही केली जात नाही. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरचा आधार घ्यावा लागतो. -----------------प्रशिक्षणाची वानवा पीएमपीच्या सेवेतील चालकांना नियमितपणे विविध बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या सर्व माहिती मुख्यालयाकडे उपलब्ध असते. मात्र, ठेकेदारांकडील चालकांना अशाप्रकारे प्रशासनाकडून प्रशिक्षण दिले जात नाही. ठेकेदारांकडून असे प्रशिक्षण मिळते की नाही, याबाबतही अधिकाऱ्यांना माहिती नाही. खरेतर संबंधित चालकांना शहरांमध्ये बस चालविण्याचे योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. बीआरटी मार्गावर हेच चालक जास्त आहेत. वाहतुकीचे नियम, शिस्त, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, अधिकारी व प्रवाशांशी संवाद, बसमधील तांत्रिक बाबी याविषयी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. पण असे प्रशिक्षण दिले जात नाही. ------------ठेकेदारांकडील सुमारे ४५० हून अधिक बस दररोज विविध मार्गांवर धावतात. प्रत्येक आगारामध्ये संबंधित ठेकेदाराचा सुपरवायझर असतो. त्याच्यामार्फत त्यांच्याकडील चालकांचे दैनंदिन मार्ग निश्चित केले जातात. त्यानुसार आगारातील पीएमपीचे अधिकारी संबंधित चालकाच्या ताब्यात बस देतात. तर पीएमपीकडून वाहक दिले जातात. काही चालक शेवटच्या फेरीला मद्यपान केल्याचे प्रकार यापुवीर्ही घडले आहेत. अनेकदा असे प्रकार समोरही येत नाहीत. अनेकदा चालत्या बसमध्ये मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांवरही कारवाई झाली आहे. वाहतुकीच्या नियमांचेही अनेक चालकांकडून सर्रासपणे उल्लंघन केले जाते. यामध्ये पीएमपीच्या सेवेतील चालकांचाही समावेश आहे. लाखो प्रवाशांचा भरवसा असलेल्या पीएमपीचे काही चालक मात्र त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून संपूर्ण यंत्रणेलाच वेठीस धरत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलBus DriverबसचालकNayana Gundeनयना गुंडेpassengerप्रवासी