शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ व मारहाण, विश्रांतवाडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 19:58 IST

महिला वाहतूक पोलिसांसह दोन मदतनीस कामगारांना शिवीगाळ करत दगडफेक करून जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार

ठळक मुद्देसहा टवाळखोर तरुणाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

येरवडा : महिला वाहतूक पोलिसांसह दोन मदतनीस कामगारांना शिवीगाळ करत दगडफेक करून जखमी  करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी विश्रांतवाडी परिसरात घडला. याप्रकरणी विश्रांतवाडीपोलिसांनी सहा टवाळखोर तरूणांविरुद्ध सरकारी कामात अडथळयासह  बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ व दगडफेक करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

येरवडा वाहतूक शाखेच्या पोलीस नाईक वंदना आल्हाट यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून या घटनेत केलेल्या मारहाणीत संतोष रायकर व लखन शेंडगे हे दोन मदतनीस कामगार जखमी झाले आहेत. संबंधित टवाळखोर तरुणांवर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. तसेच शांतिनगर परिसरातील महिला व कार्यकर्त्यांनी देखील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन व येरवडा वाहतूक शाखेबाहेर गर्दी केली होती. महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह दोघांना झालेल्या मारहाणीची गंभीर नोंद घेत पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवत बुधवारी रात्री उशिरा थेट गुन्हे दाखल केले.  बुधवारी दुपारी आळंदी रस्त्यावरील ऑर्बिट मॉल बाहेर नो पार्किंग मधील वाहनांवर कारवाई  करत असणाऱ्या महिला पोलीस नाईक आल्हाट यांना दुचाकी वरून आलेल्या तीन तरुणांनी वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत आणखी तिघा साथीदारांना त्यांनी बोलावून घेतले. या सर्वांनी मिळून कारवाईसाठी मदत करणाऱ्या दोन कामगारांवर दगडफेक करीत जखमी केले. तसेच पोलीस नाईक आल्हाट यांना धक्काबुक्की केली. शिवीगाळ  करून दगडफेक करीत सर्व आरोपी पसार झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी आरोपींची एक दुचाकी हस्तगत केली आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करू नये यासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत हस्तक्षेप सुरू होता. मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सहा आरोपींविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज वरून फरार आरोपींचा शोध विश्रांतवाडी पोलिस घेत आहेत. 

टॅग्स :Vishrantwadiविश्रांतवाडीCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस