शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बसचे रूपांतर होणार निमआराम हिरकणीत; राज्यात ७९० बस मार्गावर, पुणे विभागात ८३

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:21 IST

हिरकणी (निमआराम) बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या आणि पांढऱ्या रंगातच असणार आहेत

पुणे: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही बसमधील एसीमुळे बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय एसीमुळे शिवशाहीला पिकअपसुद्धा मिळत नाही. तसेच प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी आणि तांत्रिक कारणांमुळे शिवशाही बसचे रूपांतर आता हिरकणी बसमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील ७९० शिवशाहीसह पुणे एसटी विभागातील ८३ शिवशाही बसचे रूपांतर हिरकणीत होणार असून, याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एसटी प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी २०१७ मध्ये शिवशाही बस दाखल झाले. सुरुवातील या बसला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. परंतु कालांतराने देखभाल दुरुस्ती वेळेवर न झाल्याने या बस मार्गावर असताना वारंवार बंद पडू लागले. शिवाय बसमधील एसी बंद पडणे, अस्वच्छ असणे याच्या तक्रारी वाढत होते. यामुळे सध्या एसटी महामंडळाकडे संचलनात असलेल्या शिवशाही बसेसची टप्प्याटप्प्याने पुनर्बांधणी करून त्याचे रूपांतर हिरकणी (निमआराम) बसमध्ये करण्यात येणार आहे. तसेच त्या बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या आणि पांढऱ्या रंगातच बांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या संचलनातील उपलब्ध असलेल्या राज्यातील सर्व शिवशाही बसचे आता हिरकणीत रूपांतर होणार आहे.

शिवाजीनगर, बारामती आगारात सर्वात जास्त 

पुणे विभागात स्वारगेट, शिवाजीनगर आणि बारामती या तीन आगारात शिवशाही बसची संख्या जास्त आहे. या सर्व बसचे टप्प्याटप्प्याने हिरकणीत रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे विभागात शिवशाही बस कमी होऊन हिरकणीची संख्या वाढणार आहे. ८३ शिवशाही बसपैकी ६० पेक्षा जास्त बस दैनंदिन मार्गावर धावतात.

सध्या एसटी महामंडळाकडे संचलनात असलेल्या शिवशाही बसची टप्प्याटप्प्याने पुनर्बांधणी करून त्याचे रूपांतर हिरकणी (निमआराम) बसमध्ये करण्यात येणार असून, त्या बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या आणि पांढऱ्या रंगातच असणार आहेत. - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

टॅग्स :PuneपुणेBus Driverबसचालकpassengerप्रवासीMaharashtraमहाराष्ट्रticketतिकिटpratap sarnaikप्रताप सरनाईक