शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात शिवशाही बसची दुभाजकला धडक; नारायणगाव बाह्यवळण मार्गावरील अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 17:19 IST

या अपघातात ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले...

नारायणगाव (पुणे) : नारायणगाव बाह्यवळणाच्या खोडदरोड चौकात दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवशाही बस विरुद्ध दिशेने जाऊन दुभाजकाला धडकली. या अपघातात ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात आज (दि. १८) रोजी सकाळी ८ वाजता झाला.

दरम्यान, शिवशाही बसचा (एम. एच. ०६ एस ९४२० ) हायड्रोलिक दरवाजा लॉक झाल्याने बसची पुढची काच फोडून सुमारे ५० प्रवाशांना पिकअप टेम्पोच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. खोडद चौकात सातत्याने अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वी हिवरे येथील एक महिला अपघातात मृत्युमुखी झाली होती. खोडदला जाण्यासाठी भुयारी मार्ग रस्ता मंजूर झाला आहे. मात्र प्रत्यक्षात काम कधी सुरु होणार असा सवाल खोडद , हिवरे गावचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी केला आहे.

पुणे - नाशिक महामार्गावरील नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरील खोडदरोड चौकात दुचाकीस्वार साई सोपान पाटे (वय १९, राहणार, नारायणगाव) हा युवक खोडदच्या दिशेने जात होता. त्यावेळी पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या शिवशाही बसच्या चालकाने दुचाकीस्वार साई पाटे याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने शिवशाही बस दुभाजकाला जाऊन धडकली. त्यामध्ये बसमधील ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

अपघात झाल्यावर नारायणगाव पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील जखमींना बाहेर काढले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुचाकीस्वार साई पाटे हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

टॅग्स :narayangaonनारायणगावAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिक