शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अनंत थोपटेंना भेटले अन् अजित पवारांवर बरसले; शिवतारे जे-जे बोलले ते सगळं रेकॉर्ड झालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 14:24 IST

विजय शिवतारे यांनी भोरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंत थोपटे यांची भेट घेत त्यांना साद घातली आहे.

Shivsena Vijay Shivtare ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्यांच्याविरोधात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तसंच महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे बारामतीची लढत चुरशीची होणार असून मतदार आणि स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच इच्छुक उमेदवारांकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आज विजय शिवतारे यांनी भोरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंत थोपटे यांची भेट घेत त्यांना साद घातली आहे. तसंच यावेळी थोपटे यांच्याशी चर्चा करताना शिवतारेंनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे.

अनंत थोपटे यांच्याशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, "अजित पवार यांची मानसिकता खराब आहे. या मानसिकतेच्या विरोधात आपली लढाई आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात ६ लाख ८६ मतदार पवारांच्या बाजूने आहेत आणि ५ लाख ५० हजार मतं पवारविरोधी आहेत. या पवारविरोधी मतदारांना आपण मतदानाची संधी द्यायला हवी. मी तर यावेळी निकालच लावणार आहे. लोकांनी साथ देऊन जर लोकं तर ताकदीने उतरले आणि त्यांनी बदल घडवला तर चांगली गोष्ट आहे," अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी आपली भूमिका मांडली. 

"पुरंदरमध्ये काय स्थिती आहे?" असा प्रश्न चर्चेवेळी अनंत थोपटे यांनी विचारला. त्यावर बोलताना विजय शिवतारे यांनी म्हटलं की, "पुरंदर एकहाती चालेल. कारण लोकं त्यांच्यावर चिडून आहेत. २०१९ मध्ये मला काय बोलले अजित पवार? तुझा आवाका किती, तू बोलतो कोणासोबत, तू कसा निवडून येतो हे बघतो, अशी भाषा त्यांनी वापरली. त्यांच्यात प्रचंड गुरमी आहे. मी त्यांना माफ केलं, पण लोकं नाहीत माफ करणार. बापू आम्ही नोटाला मतदान करू, पण अजित पवारांना मतदान करणार नाही, असं पुरंदर, दौंड, इंदापूरची लोकं सांगत आहेत. आता काय व्हायचं ते होईल, ते मला फाशी देतील, गोळ्या घालतील, त्यांना काय करायचं ते करू द्या. यावेळी आपले आशीर्वाद असावेत, अशी मला अपेक्षा आहे,"  असं शिवतारे म्हणाले.

शिवतारेंच्या भेटीनंतर काय म्हणाले अनंत थोपटे?

विजय शिवतारे यांनी भेट घेत आशीर्वाद मागितल्यानंतर प्रसारमाध्यमांनी अनंत थोपटे यांनाही प्रतिक्रिया विचारली. त्यावर थोपटे यांनी अद्याप आपण निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं. "शरद पवार शेवटपर्यंत माझ्या विरोधात होते. त्यावेळी दिल्ली माझ्यासोबत होती तरी देखील माझा पराभव झाला. तेव्हा माझा पराभव कसा झाला हे सर्वांनाच माहीत आहे. तरीदेखील मी शेवटपर्यंत काँग्रेस सोडली नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार मला भेटून गेले. त्यावेळी जुन्या आठवणी जागा झाल्या. बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता शरद पवारांची मुलगी आणि अजित पवारांची पत्नी निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात शिवतारे उभे आहेत. त्यामुळे कुणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल अद्याप विचार केला नाही. विचार करून याबद्दल निर्णय घेणार आहे," असं अनंत थोपटे यांनी सांगितलं आहे.

टॅग्स :Vijay Shivtareविजय शिवतारेAjit Pawarअजित पवारbaramati-pcबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस