शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण व्हावा : छत्रपती संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 8:00 PM

शिवराज्याभिषेक लोकोत्सव होण्यात ‘दगडूशेठ’ नेही मोलाचे योगदान : छत्रपती संभाजीराजे

ठळक मुद्देकिल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना जगभर पोहोचवण्याचे काम होणार

पुणे : शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण व्हावा, याकरीता आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवराज्याभिषेक उत्सवाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे रायगडावर दर वर्षी फुलांची आकर्षक आरास केली जाते. त्यामुळे या सोहळ्याला देखणेपण आले आहे. शिवराज्याभिषेक लोकोत्सव होण्यात ‘दगडूशेठ’ नेही मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे भविष्यातही शासनाने किल्ले दत्तक योजना सुरु केल्यानंतर ट्रस्टने यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास समाजात सकारात्मक संदेश जाईल, असे मत कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या बाजीराव रस्त्यावरील गणेशोत्सव सजावट विभागाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, सौरभ रायकर, मंगेश सुर्यवंशी, अतुल चव्हाण, अक्षय गोडसे, राजेंद्र चिंचोरकर आदी उपस्थित होते. शिल्पकार विवेक खटावकर यांनी यंदाच्या सजावटीची माहिती दिली. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘अनेक ठिकाणी सीएसआर निधी सामाजिक कामांसाठी वापरला जातो. भविष्यात किल्ले दत्तक योजना सुरु झाल्यानंतर अनेकांकडून हा निधी किल्ल्यांसाठी वापरणे देखील आवश्यक आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टने पुढाकार घेतल्यास किल्ले संवर्धनाचा चांगला संदेश समाजात जाईल. किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना जगभर पोहोचवण्याचे काम देखील होणार आहे.’

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजDagdusheth Templeदगडूशेठ मंदिरFortगड