शिवनेरी लायन्स ऑक्सिजन बँक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:23+5:302021-05-15T04:09:23+5:30
नारायणगाव या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन, प्लाझ्मादान अभियान, लसीकरण जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंट या उपक्रमाने सुरुवात केली. लायन्स ...

शिवनेरी लायन्स ऑक्सिजन बँक सुरू
नारायणगाव या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन, प्लाझ्मादान अभियान, लसीकरण जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंट या उपक्रमाने सुरुवात केली.
लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीतील सर्व सदस्यांनी मदत निधी उभा करून १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन घेतल्या आहेत तर लायन्स व लिओ क्लब प्लाझ्मादान अभियानामार्फतही प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत लायन्समार्फत ५० पेक्षा जास्त रुग्णांना प्लाझ्मा दिला आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ नारायणगाव येथे करण्यात आला. यावेळी नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे, युवा नेते अमित बेनके, लायन्सचे रिजन चेअरपर्सन एमजेजी मनोज भळगट आणि क्लबचे सर्व सभासद उपस्थित होते. हा उपक्रम लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष मिलिंद झगडे, सचिव विश्वास भालेकर, खजिनदार बंडू कर्पे, प्रथम अध्यक्ष संपत शिंदे, प्रोजेक्ट समन्वयक योगेश जुन्नरकर, नरेंद्र गोसावी तसेच प्लाझ्मादान अभियानासाठी राजेश देसाई, लिओ रोहन पाटे, लिओ प्रसाद जठार, लिओ मंदार रत्नपारखी यांनी यांच्या संकल्पनेतून करण्यात आला आहे.
१४ नारायणगाव शिवनेरी लायन्स
शिवनेरी लायन्स ऑक्सिजन बँक शुभारंभरप्रसंगी बाबू पाटे, अमित बेनके, मनोज भळगट, मिलिंद झगडे, विश्वास भालेकर.