शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:25 IST

पुणे :  जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी नारायणगावच्या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न आणि खासदार ...

पुणे : जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी नारायणगावच्या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, केंद्र सरकारने 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन बहाल केले. जुन्नर तालुक्यात आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हा हापूस आंबा वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी ओळखला जातो. त्यामुळे जुन्नरच्या हापूस आंब्याला 'शिवनेरी हापूस' म्हणून जीआय मानांकन मिळावे, यासाठी नारायणगावचे ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र प्रयत्नशील होते.  शिवनेरी हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी खासदार डॉ. कोल्हे सन २०२२ पासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, जशी काश्मिरी केशर, बनारसी साडी किंवा दार्जिलिंग चहा या धर्तीवर जुन्नर तालुक्यातील आंब्याला 'शिवनेरी हापूस आंबा' अशी ओळख मिळाली आहे.यासंदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्यानुसार वेळोवेळी प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली. त्यामुळे या भागाचा लोकप्रतिनिधी खासदार म्हणून केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करीत होतो. त्यामुळे शिवनेरी हापूसला जीआय मानांकन मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलता आला, याचा विशेष आनंद आहे. त्याचबरोबर पालकमंत्री अजितदादा पवार व माजी आमदार अतुल बेनके, अनिल तात्या मेहेर यांचेही याकामी सहकार्य मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.जीआय मानांकन म्हणजे काय?

  •  एखादे उत्पादन ठराविक भौगोलिक परिस्थितीत विशिष्ट भागात घेतले जात असेल आणि त्याला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला जीआय मानांकन दिले जाते. हे मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते. नफा तसेच गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी उत्पादकांना त्याचा फायदा होतो. 
  • जीआय मानांकन हे उत्पादन आणि प्रदेशाशी निगडीत आहे. कारण वेगवेगळ्ळ्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित केले जाणाऱ्या उत्पादनाची गुणवत्ता वेगवेगळी असू शकते. ही ओळख कायम ठेवणे जीआय मानांकनामुळे शक्य होते.  
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMangoआंबाJunnarजुन्नर