औैटी यांना शिवनेरीभूषण पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:24 IST2019-02-22T01:23:56+5:302019-02-22T01:24:05+5:30

औटी हे गेल्या २५ वर्षांपासून ग्राहकांच्या हक्कासाठी काम करत आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी शेतकरी ग्राहक मेळावे

Shivneri Bhushan Award for OTY | औैटी यांना शिवनेरीभूषण पुरस्कार प्रदान

औैटी यांना शिवनेरीभूषण पुरस्कार प्रदान

राजुरी : शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळातर्फे ग्राहक संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांना शिवनेरीभूषण पुरस्कार ओझर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानचिन्ह व सन्मानपत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले .

औटी हे गेल्या २५ वर्षांपासून ग्राहकांच्या हक्कासाठी काम करत आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी शेतकरी ग्राहक मेळावे, अभ्यासवर्ग, रचनात्मक आंदोलन या पद्धतीने ‘गाव तेथे ग्राहक पंचायत’ या अभियानाची औटी यांनी सुरुवात केली आहे. ग्राहक जागृतीसाठी औटी यांनी महाराष्ट्रात एक हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. ग्राहक चळवळीचा प्रभावी कार्यकर्ता म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय ग्राहक संरक्षण युवा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्राप्त झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा हा पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, शिवनेरीचे शिलेदार आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: Shivneri Bhushan Award for OTY

टॅग्स :Puneपुणे