शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर बस स्थानकाचे होणार स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 17:11 IST

मेट्रोचे काम तीन महिन्यांत सुरू होणार असल्याने एसटीने बसस्थानकासाठी जागा पाहणी सुरू केली आहे. सध्या एसएसपीएमएस संस्थेचे मैदान, अंडी उबवणी केंद्राजवळील चार एकर जागा तसेच कृषी महाविद्यालयाच्या जागेवर विचार सुरू आहे.

ठळक मुद्देमेट्रोचे भुयारी स्थानक व बोगद्याचे काम आॅक्टोबर महिन्यापासून करण्याचे नियोजन आॅक्टोबर महिन्यापुर्वी हे स्थलांतर करावे लागणार

पुणे : मेट्रो तसेच बस पोर्टच्या कामासाठी शिवाजीनगर येथील बसस्थानक लवकरच अन्यत्र स्थलांतरीत केले जाणार आहे. त्यासाठी सध्या तीन जागांची पाहणी करण्यात आली असून त्याला अद्याप एसटी महामंडळाने हिरवा कंदील दिलेला नाही. आॅक्टोबर महिन्यापुर्वी हे स्थलांतर करावे लागणार आहे.शिवाजीनगर येथे एस.टी. महामंडळाची १५ हजार ७०० चौरस मीटर जागा आहे. सध्या या जागेवर बसस्थानक, वर्कशॉप व एसटीची कार्यालये आहेत. या जागेवर अत्याधुनिक बस पोर्ट उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. तसेच महामेट्रोकडून या जागेत भुयारी स्थानक केले जाणार आहे. त्याबाबत महामेट्रोकडून एसटीला याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. भुयारी स्थानक व बोगद्याचे काम आॅक्टोबर महिन्यापासून करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे त्यापूर्वी येथील बसस्थानक, वर्कशॉप इतरत्र हलवावे लागणार आहे. महामेट्रोला एसटीकडून ३ हजार १८५ चौरस मीटर जागा दिली जाणार आहे. त्याचा करार लवकरच होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. मेट्रोचे काम तीन महिन्यांत सुरू होणार असल्याने एसटीने बसस्थानकासाठी जागा पाहणी सुरू केली आहे. सध्या एसएसपीएमएस संस्थेचे मैदान, अंडी उबवणी केंद्राजवळील चार एकर जागा तसेच कृषी महाविद्यालयाच्या जागेवर विचार सुरू आहे. मात्र, अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. यापैकी एक जागा अंतिम झाल्यानंतर बसस्थानकाचे स्थलांतर सुरू केले जाईल. मात्र, या जागेवरून केवळ बस सोडल्या जाणार आहे. तिथे वर्कशॉपची उभारणी केली जाणार आहे. स्वारगेट, पिंपरी या आगारांमध्ये वर्कशॉप व इतर कामे होणार आहे. त्यामुळे एसटीला काहीसा भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे. ------------

टॅग्स :Puneपुणेshivaji nagar bus depotशिवाजी नगर बसस्थानकMetroमेट्रो