शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीला सवलतीत सोडावी शिवशाही बस; दिवाकर रावते यांच्याकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 13:02 IST

शिवजयंतीला सवलतीच्या दरात ‘शिवशाही’ बससेवा द्यावी अशी मागणी सह्याद्री गिरीभ्रमण संस्था आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देसह्याद्री गिरीभ्रमण संस्था आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणीपुणे, नाशिक आणि मुंबईच्या विभागीय नियंत्रकांना दिले मागणीचे पत्र

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार आणि तारखेनुसार येणाऱ्या जयंतीला (४ मार्च) एस.टी. महामंडळाने शिवनेरी आणि रायगड किल्ल्याला जाण्यासाठी सवलतीच्या दरात ‘शिवशाही’ बससेवा द्यावी अशी मागणी सह्याद्री गिरीभ्रमण संस्था आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.  महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी आणि तिथीनुसार (यंदा ४ मार्च २०१८) साजरी केली जाते. त्यासाठी शिवनेरी बसच्या प्रवास शुल्कामध्ये विशेष सवलत देण्यात यावी. तसेच प्रवाशांना परतीच्या प्रवासा दरम्यान ग्रामीण खाद्यसंकृतीचा आनंद घेता यावा यासाठी शिवनेरीच्या पायथ्याशी स्थानिकांच्या सहकार्याने विशेष शाकाहारी वन भोजनाचे आयोजन करता येईल. यामाध्यमातून स्थानिकांना देखील रोजगार उपलब्ध होईल, असे संस्थेच्या वतीने सूचविण्यात आले आहे. तसेच, याचप्रकारची बससेवा शिवराज्याभिषेक आणि शिवपुण्यतिथीला रायगडावर देखील करावी अशीही मागणी पत्रात केली आहे. दरम्यान संस्थेच्या वतीने या मागणीचे पत्र पुणे, नाशिक आणि मुंबईच्या विभागीय नियंत्रकांना देखील दिले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री यांनी सांगितले. तर किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध किल्ले एसटीच्या बससेवेद्वारे जोडण्यात यावेत. या बससेवेला किल्ल्यांची नावे देण्यात यावीत. अशी मागणी देखील यापूर्वीच महामंडळाकडे करण्यात आली आहे. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावPuneपुणे