शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

पिंपरीत शिवसेनेचा पेट्रोल - डिझेल दरवाढीविरोधात सायकल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:01 IST

शेतकरी, नोकरदार, उद्योजक, विद्यार्थी, कामगार अशा सर्वच घटकांमध्ये केंद्र व राज्य सरकारविषयी नाराजी आहे. इंधन दरवाढीच्या विरोधातील जनतेचा आक्रोश सरकारला ऐकवण्यासाठी सायकल मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देइंधनाची दरवाढ गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठी दरवाढमहाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमध्ये ८ ते १० रुपयांनी स्वस्त इंधन

पिंपरी : पेट्रोल - डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक पावित्रा घेत बुधवारी सायकल मोर्चा काढला. घोषणाबाजी करीत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळफेक करुन सर्वसामान्यांचे बजेटच कोलमडून टाकणाऱ्या भाजप सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी केली.  पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने बुधवारी मोरवाडी चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चा काढला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोचार्चा समारोप करण्यात आला. इंधन दरवाढ रद्द करा, नाही तर खुर्च्या खाली करा, कहा गये..कहा गये..अच्छे दिन कहा गये... कब मिलेंगे.. कब मिलेंगे.. १५ लाख कब मिलेंगे..मोदी सरकार मुदार्बाद, अशा घोषणा देत केंद्र सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहरसंघटक सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. खासदार बारणे म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढलेले नसताना आपल्या देशात इंधनाचे दर का वाढले आहेत. वास्तविक ३५ रुपये लिटरने मिळू शकणारे पेट्रोल ८५ रुपये लिटरने विकत घ्यावे लागत आहे. सरकारने इंधनावर तब्बल ६६ टक्के कर लावला आहे. त्यामुळे दुप्पट किमतीने इंधन खरेदी करावे लागत आहे. भाजपने जनतेला आश्वासन देताना महागाई कमी करु, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावात दीड पट वाढ करु, मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योग आणू, रोजगार निर्मिती करू, अशी आश्वासने दिली होती. मात्र शेतकरी, नोकरदार, उद्योजक, विद्यार्थी, कामगार सर्वच घटकांमध्ये केंद्र व राज्य सरकारविषयी नाराजी आहे. जनतेचा आक्रोश सरकारला ऐकवण्यासाठी मोर्चा काढण्यात आले.आमदार चाबुकस्वार म्हणाले, इंधनाची दरवाढ गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठी दरवाढ असून, सरकारला महागाई कमी करण्याचा विसर पडला आहे. सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असून, कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे. आकाशाला भिडलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सलग १५ दिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमध्ये ८ ते १० रुपयांनी स्वस्त इंधन मिळत आहे. त्यामुळे सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणून दरवाढ तत्काळ कमी करावी.

टॅग्स :PuneपुणेPetrolपेट्रोलDieselडिझेलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा