शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

शिवसेनेला हव्यात पुण्यातील तीन जागा : पक्षप्रमुखांना सांगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 8:07 PM

लोकसभेसाठी काम करण्याच्या बदल्यात शिवसेनेला भारतीय जनता पार्टीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या तीन जागा हव्या आहेत.

ठळक मुद्देआपले किमान तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात येणार पक्षप्रमुखांना सांगणार : भाजपाच्या भूमिकेबाबत शिवसैनिक साशंक

पुणे : लोकसभेसाठी काम करण्याच्या बदल्यात शिवसेनेला भारतीय जनता पार्टीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या तीन जागा हव्या आहेत. पक्षप्रमुखांकडे तशी मागणीच करण्यात येणार असून त्यासाठी संयुक्त बैठकीचा मुहुर्त पुण्यातील प्रमुख शिवसैनिकांनी धरला असल्याची माहिती मिळाली. आधी तसा शब्द घ्यावा असे सांगण्यात येणार असल्याचे समजते. लोकसभेची सन २०१४ ची निवडणूक भाजपासेनेने संयुक्तपणे लढली. त्यात भाजपाला मोठा विजय मिळाला. सव्वातीन लाखांच्या फरकाने भाजपाने काँग्रेसवर विजय मिळवला. त्यात शिवसेनेचाही मोठा वाटा होता. मात्र त्यानंतर विधानसभेला भाजपाने युती तोडली. त्यामुळे शिवसेनेला स्वतंत्रपणे लढावे लागले. त्यात पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघावर भाजपाने वर्चस्व मिळवले. मात्र हडपसर, कोथरूड, वडगावशेरी, पर्वती या चार विधानसभा मतदारसंघात शिवसेना दुसºया क्रमाकांवर होती. त्यामुळेच आता लोकसभेला युती आहे तर त्याचवेळी विधानसभांचे वाटपही निश्चित करून घ्यावे असे बहुसंख्य शिवसैनिकांचे मत आहे. कोणते मतदार संघ मागायचे यावर सध्या एकमत नसले तरी तो आपला प्रश्न आहे, आपल्या स्तरावर मिटवता येईल, पण त्यांच्याकडून तीन विधानसभा मतदारसंघांचा शब्द घ्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे. त्यातही कोथरूड व शिवाजीनगरबाबत शिवसैनिक आग्रही आहेत, कारण या दोन्ही मतदारसंघावर त्यांच्याच झेंडा होता. मात्र संघाने तिथे मुसंडी मारल्यामुळे अनेक शिवसैनिक दुखावले गेले आहेत. त्यानंतर गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी असेल तर कसबा किंवा वडगाव शेरी मतदारसंघ मागावा असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. भाजपाकडून त्यांच्या निवडणूकीच्या वेळेस काम करून घेतले जाते, त्यानंतर शिवसेनेची वेळ असेल त्यावेळी मात्र फसवले जाते अशी तक्रारही शिवसेनेत कायम करण्यात येत असते. शिवसेनेचा उमेदवार असेल त्या मतदारसंघातील भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तिथेच काम करणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र ते जिथे भाजपाचा उमेदवार असेल तिथे जाऊन काम करतात व त्याचा फटका मतदानाला बसतो असे काही शिवसैनिकांनी सांगितले. संयुक्त बैठकीत हाही मुद्दा उपस्थित करण्याबाबत स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे शिवसैनिक आग्रह धरत आहेत.  ................आपले किमान तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात येणार आहेत, याची भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही जाणीव आहे. कोणते मतदारसंघ याबाबत मात्र ते अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच लोकसभा मतदारसंघातील सहाही आमदार चिंतीत आहेत. त्यातही शहराच्या मध्यभागातील आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळेल किंवा नाही याची धास्ती वाटते आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणBJPभाजपा