माजी सैनिकांना कर माफ करण्याची शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:21 IST2021-02-05T05:21:15+5:302021-02-05T05:21:15+5:30

नगर विकास मंत्रालयाने शासनदरबारी हा निर्णय घेतला आहे. तसेच या योजनेस ‘बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक/ विधवा पत्नीला मालमत्ताकर माफी ...

Shiv Sena demands tax exemption for ex-servicemen | माजी सैनिकांना कर माफ करण्याची शिवसेनेची मागणी

माजी सैनिकांना कर माफ करण्याची शिवसेनेची मागणी

नगर विकास मंत्रालयाने शासनदरबारी हा निर्णय घेतला आहे. तसेच या योजनेस ‘बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक/ विधवा पत्नीला मालमत्ताकर माफी योजना’ असे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.

माजी सैनिकांनी देशासाठी प्राणांची बाजी लावून जिवाची पर्वा न करता नि:स्वार्थीपणे देशाचे संरक्षण केले आहे. शहरात विविध भागांत कायम वास्तव्य करीत असलेल्या अनेक माजी सैनिक, विधवांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांनी देशसेवेसाठी केलेल्या योगदानाबाबत योग्य सन्मान राखला जाईल. शासन निर्णयानुसार मनपा प्रशासनाने मुख्य सभेत हा विषय गांभीर्याने मांडून, योग्य तरतुदीद्वारे मंजुरी घ्यावी. त्यामुळे शहरातील असंख्य सैनिक, माजी सैनिक आणि कुटुंबीय यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येईल, असे पोकळे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

फोटो :

Web Title: Shiv Sena demands tax exemption for ex-servicemen