शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगरवर शिवसेनेचा दावा ? विनायक निम्हण सक्रीय झाल्याने चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 07:00 IST

शिवसेनेने शिवाजीनगरची मागणी केली आहे़...दुसरीकडे भाजपामध्ये विद्यमान आमदार विजय काळे यांच्यासह इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे़.

ठळक मुद्देशिवसेना आणि भाजपालाच कायम विधानसभा आणि लोकसभेत भक्कम आघाडी

पुणे : भाजपा, शिवसेनेला कायम साथ देणारा म्हणून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो़.. भाजपामध्ये इच्छुकांची झालेली भाऊ गर्दी आणि त्याचवेळी शिवसेनेने पुणे शहरातील दोन विधानसभेवर दावा केला आहे़.. त्याचवेळी गेली दोन वर्षे राजकारणापासून अलिप्त राहिलेले माजी आमदार विनायक निम्हण यांनी वाढदिवसानिमित्त पुन्हा सक्रीय झाले आहेत़. त्यामुळे शिवाजीनगर शिवसेनेच्या वाटेला जाणार का अशी चर्चा सुरु झाली आहे़. विनायक निम्हण हे काँग्रेसमध्ये असताना शिवाजीनगरमध्ये काँग्रेसचा पंजा विजयी झाला होता़. तो अपवाद वगळता येथे शिवसेना आणि भाजपालाच कायम विधानसभा आणि लोकसभेत भक्कम आघाडी मिळत आली आहे़. भाजपाचे विद्यमान आमदार विजय काळे यांनी २०१४ मध्ये २२ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविला होता़. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी शिवाजीनगरमधून मिळाली होती़. त्यामुळे युतीमध्ये ही विधानसभा भाजपाच्याच वाट्याला राहते की शिवसेनेला दिली जाते, याविषयी मतदारसंघात उत्सुकता आहे़. शिवसेनेने शिवाजीनगरची मागणी केली आहे़. त्याचवेळी विनायक निम्हण यांनी मतदारसंघात वाढदिवसांचे निमित्त साधून विविध कार्यक्रम घेऊन जनसंपर्क सुुरु केला़. शिवसेनेचे वरिष्ठ नेतेही शिवाजीनगर मतदारसंघ मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जात आहे़. दुसरीकडे भाजपामध्ये विद्यमान आमदार विजय काळे यांच्यासह इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे़. माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे, निलिमा खाडे, दत्तात्रय खाडे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत़. या मतदारसंघात तब्बल ३१ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत़. त्यामुळे विद्यमान आमदारांना रिपिट करायचे की शिवसेनेला हा मतदारसंघ सोडायचा असा प्रश्न भाजपापुढे आहे़. काँग्रेसकडून मनिष आनंद हे यांनी गेल्या वषीर्पासूनच तयारी सुरु केली आहे़. शिवाजीनगरमधून काँग्रेसकडून अनेक इच्छुक असले तरी मनिष आनंद याची तयारी पाहता कॉंग्रेसमध्ये त्यांचे पारडे जड आहे़.  याअगोदर येथून कोणाला तिकीट मिळणार अशा चर्चेची जागा आता युतीत ही जागा कोणाला सुटणार अशी चर्चा रंगू लागली आहे़. 

टॅग्स :Puneपुणेshivajinagar-acशिवाजीनगरPoliticsराजकारणElectionनिवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना