शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

पुण्यात शिवजयंती महोत्सव मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 11:31 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली. 

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा सुरू झाला.  मिरवणुकीचे हे सातवे वर्ष असून यावर्ष त्यात स्वराज सेनापतीचे 75 रथ त्यात सहभागी झाले आहेत.

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा सुरू झाला.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, माजी आमदार भीमराव तापकीर, समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, बिव्हिजि ग्रुपचे हणमंत गायकवाड, रोहित पवार, उद्योजक विठ्ठल मानियसार, अभिनेते प्रवीण तरडे आदी यावेळी उपस्थित होते. पाटील यांच्या हस्ते यावेळी दामरावजी गायकवाड यांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले.

मिरवणुकीचे हे सातवे वर्ष असून यावर्ष त्यात स्वराज सेनापतीचे 75 रथ त्यात सहभागी झाले आहेत. मिरवणूकीची सुरुवात कोल्हापूर येथील भवानी मंडप प्रवेशद्वारची प्रतिकृती असलेल्या रथाने झाली. शिवराय आणि मावळ्यांच्या वेशातील अनेक चिमुकले मिरवणुकीत होते. शहरातील विविध लेझीम आणि ढोल ताशा पथकांनी वादन केले. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त मिरवणूक मार्गावर तैनात करण्यात आला होता. 

मिरवणुकीत जिजाऊशहाजी शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक निंवगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडु शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुर्याजी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक यांचे रथ सहभागी झाले आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंतीPuneपुणे