शिराळशेठ राजाचा उत्सव साजरा
By Admin | Updated: August 3, 2014 00:43 IST2014-08-03T00:43:25+5:302014-08-03T00:43:25+5:30
शिराळशेठ राजाचा उत्सव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

शिराळशेठ राजाचा उत्सव साजरा
पुणो : शिराळशेठ राजाचा उत्सव येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
सकाळी दत्त संप्रदायाच्या अहमदनगर येथील मठाचे मठाधिपती राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते शिराळशेठ राजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या वेळी गीतांजली जेधे यांना शिराळशेट उत्सव ट्रस्ट तर्फे पुरस्कार देण्यात आला. आमदार गिरीश बापट, भाजपचे गटनेते गणोश बिडकर, मंजिरी धाडगे, उत्सवप्रमुख ओंकार बकरे, प्रमुख विश्वस्त विकास बकरे उपस्थित होते. शिराळशेठ राजा हा शंकराचा अवतार आहे, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे ज्या दिवशी त्यांना राजा केले तो दिवस आजही भक्तांकडून साजरा होतो. अडीच-तीन हजारांची गर्दी नारळांची तोरणो घेऊन दर्शनासाठी उसळते.
(प्रतिनिधी)
तीनशे वर्षाची परंपरा
4गेली 3क्क् र्वष हा उत्सव सुरू आहे. शिराळशेठ राजाची 8 फूट उंचीची भव्य मूर्ती उभारली जाते. त्याचा मुखवटा शेकडो र्वष जुना असून, त्याचे वजन 585 किलो इतके आहे. बकरे घराण्याची पाचवी पिढी हा उत्सव साजरा करीत आहेत.