शिरूरला आज एसटी रोको आंदोलन
By Admin | Updated: June 27, 2014 22:27 IST2014-06-27T22:27:38+5:302014-06-27T22:27:38+5:30
‘बीओटी’संदर्भात पाहणी करण्यासाठी विभाग नियंत्रकाने शिरूर आगारास अनेकदा भेटी दिल्या.

शिरूरला आज एसटी रोको आंदोलन
>शिरूर : ‘बीओटी’संदर्भात पाहणी करण्यासाठी विभाग नियंत्रकाने शिरूर आगारास अनेकदा भेटी दिल्या. मात्र, हा विषय आपल्या अखत्यारीतला नसल्याने विभाग नियंत्रक सांगत जबाबदारी झटकत असल्याने, उद्या (शनिवारी) बसस्थानकात येणा:या व जाणा:या एसटीबसेस रोखून धरण्यात येणार आहेत, असे उपोषणकर्ते संजय पाचंगे यांनी तहसीलदार रघुनाथ पोटे यांना सांगितले. पाचंगे यांचा उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आज तहसीलदार पोटे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. विभाग नियंत्रकांशी चर्चा केली.
मात्र, हा विषय आपल्या अखत्यारीतला नसल्याने विभाग नियंत्रक सांगत असल्याचे पोटे यांनी पाचंगे यांना सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून पुण्याहून नगरकडे व नगरहून शिरूरकडे जाणा:या एसटी बसेस शिरूर बसस्थानकात येण्यास नकार देत असल्याची मोठी समस्या असताना, विभाग नियंत्रकाने येथे येऊन याची दखल घेतली नाही.
मात्र, ‘बीओटी’च्या कामासंदर्भात विभाग नियंत्रकाने आगारास अनेकदा भेटी दिल्या. बसस्थानक आवारातील दुकानदारांना दुकाने खाली
करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या, त्यादेखील विभाग नियंत्रकाच्या सहीनेच आहेत. अशात हा विषय आपल्या अखत्यारीतला नाही, असे सांगून विभाग नियंत्रक कोणाची दिशाभूल करताहेत, असा प्रश्न पाचंगे यांनी केला.
मग, हा प्रकार रोखण्यासाठीही ज्यांची जबाबदारी आहे त्यांनीच यावे, असे आव्हान पाचंगेंनी विभाग नियंत्रकास दिले. युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी आज पाचंगेना पाठिंबा दर्शविला.
रिक्षा पंचायत, रामलिंग सहाआसनी, पियागो रिक्षा संघटना यांनीही पाचंगे यांना पाठिंबा दर्शविला.
वैयक्तिकरीत्या नागरिकांचाही पाठिंबा वाढतानाचे चित्र आहे.
(वार्ताहर)
4शिरूर बसस्थानकाचा बीओटी प्रकल्प जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी निगडित असल्याने ते अप्रत्यक्षरीत्या प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पाचंगे यांनी केला. प्रशासन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याने, उद्या बसेस रोखून धरण्यात येणार असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.