शिरूर-न्हावरेफाटा येथे रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या तरुणाला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:00+5:302021-02-05T05:11:00+5:30
शिरूरजवळ न्हावरे फाटा येथे रिव्हॉल्व्हर विक्रीसाठी आलेल्या तरुणाला शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने पकडले असून, त्याच्याकडून दोन पिस्टल(रिव्हॉल्व्हर ) ...

शिरूर-न्हावरेफाटा येथे रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या तरुणाला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद
शिरूरजवळ न्हावरे फाटा येथे रिव्हॉल्व्हर
विक्रीसाठी आलेल्या तरुणाला शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने पकडले असून, त्याच्याकडून दोन पिस्टल(रिव्हॉल्व्हर ) व सहा जिवंत काडतुसे असा एकूण ७३ हजार रुपये ऐवज जप्त केला असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.
याप्रकरणी प्रशांत शामराव खुटेमाटे (वय ३१ वर्ष , रा. शिरूर पोलीस लाईन ता. शिरूर जि. पुणे)पोलीस अंमलदार यांनी फिर्याद दिली आहे.
समाधान लिंगप्पा विभुते (वय २६ वर्ष, सध्या रा खांदवे नगर, वाघोली, जि. पुणे, मूळ राहणार पळशी सुकली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यास शिरूर पोलिसांनी दोन पिस्टल व सहा जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेली माहिती. २४ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर केसेस करणेकामी व सोबत पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे ,पोलीस नाईक प्रफुल भगत ,पोलीस आमलदार साळुंखे असे पोलीस स्टेशन हद्दीत खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांना बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एक तरुण हा त्याचे ताब्यात दोन पिस्टल हत्यार जवळ बाळगून तो न्हावरे फाटा कानिफनाथ मंदिराशेजारी विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार त्यांनी याबातमीचा मागमुस काढत पोलीस निरीक्षक खानापुरे यांना व पथकाला फोनद्वारे कळवले . त्याप्रमाणे पोलीस पथकाने न्हावराफाटा या परिसरात खासगी वाहन घेऊन सापळा रचला. सायंकाळी सहाच्या दरम्यान संशयित तरुण संशयास्पद फिरताना दिसला, त्याला पोलीस पथकाने नाव पत्ता विचारले,असता त्याने त्याचे नाव समाधान लिंगप्पा विभुते (वय २६ वर्ष सध्या राहणार खांदवे नगर, वाघोली, जि. पुणे, मूळ राहणार पळशी सुकली ता. पंढरपूर जि. सोलापूर )असे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे यांनी त्याची पंचा समक्ष झडती घेतली असता त्याचे कमरेला दोन पिस्टल व पॅन्टच्या खिशात सहा जिवंत राऊंड मिळून आले. तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे हे करीत आहे.