मुरूम उत्खननप्रकरणी शिरूर नगर परिषद, म्हाडाला ८८ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:13+5:302021-03-09T04:12:13+5:30
शिरूर : शिरूर नगर परिषद आणि पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाला (म्हाडा) शिरूरच्या तहसीलदारांनी मुरूम उत्खनन प्रकरणी ८८ ...

मुरूम उत्खननप्रकरणी शिरूर नगर परिषद, म्हाडाला ८८ लाखांचा दंड
शिरूर : शिरूर नगर परिषद आणि पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाला (म्हाडा) शिरूरच्या तहसीलदारांनी मुरूम उत्खनन प्रकरणी ८८ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार
अवैधरीत्या मुरूम उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी दंडाची नोटीस दिली आहे. याबाबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद यांनी तक्रार केली होती. दि. ९ व १४ डिसेंबर २०२० रोजी शिरूर शहर हद्दीत हुडको कॉलनी (संभाजीनगर ) शेजारील टेकडीचे उत्खनन केल्याची तक्रार त्यांनी दिली केली होती. या तक्रारीची दखल घेत दि.२३ डिसेंबर रोजी कामगार तलाठी यांनी स्थळपाहणी करून अंदाजे १५०० ब्रास मुरुम उत्खनन करून नेल्याची आढळून आले. कामगार तलाठी एस. टी. देशमुख यांनी पंचनामा अहवाल सादर केला होता. पुराव्यासह सात दिवसांच्या आत लेखी म्हणणे खुलासा
सादर करावे, अन्यथा आपले काही म्हणणे नाही असे समजून एकतर्फी कार्यवाही केली जाईल असे या नोटिशीत म्हटले असल्याचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद,
प्रवासी संघाचे अनिल बांडे , मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर यांनी सांगितले.
.
याप्रकरणी शिरूर नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले की, याबाबतचे पत्र नगर परिषद कार्यालयास अद्याप मिळाले नाही. हे पत्र मिळाल्यानंतर योग्य तो खुलासा नगर परिषदेच्या वतीने शिरूरच्या तहसीलदारांना सादर करण्यात येईल.