शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

Shirur Lok Sabha Result 2024: बघतोस कसा निवडून येतो, या आव्हानाला स्वीकारत कोल्हेंचा विजय, आढळरावांचा पराभव का झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 16:16 IST

Shirur Lok Sabha Result 2024 राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) कार्यकर्त्यांची उमेदवारीवर नाराजी असल्याचे प्रमुख कारण समोर

Shirur Lok Sabha Result 2024शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील  (Shivajirao Adhalarao Patil) यांचा जवळपास १ लाख ४१ हजार १५ मतांनी पराभव करून विजय मिळवला. निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी बघतोस कसा निवडून येतो, या चॅलेंजला अमोल कोल्हे यांनी सुरुंग लावला अन् निवडून आले. कोल्हे यांना ६ लाख ९८ हजार आठशे, तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना ५ लाख ५७ हजार ७८५ मतांवर समाधान मानावे लागले आहे.

लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी तुतारी वाजवत डाॅ. अमोल कोल्हे यांना पुन्हा खासदारकी बहाल करून दिल्लीला रवाना केले आहे. शिरूर लोकसभेच्या रणांगणात आजी माजी खासदारांमध्ये झालेल्या लढतीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी पहिल्यापासूनच आघाडी घेतल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला व माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिरूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून कोल्हे आघाडीवर राहिले असून, शरद पवारांच्या बाबतीत असलेली सहानुभूती व निष्ठावंतांनी मोठी कंबर कसली होती. सहा विधानसभांपैकी पाच जागांवर युतीचे दिलीप वळसे पाटील, महेश लांडगे, दिलीप मोहिते, अतुल बेनके, चेतन तुपे हे आमदार आढळराव यांच्या बाजूने असताना, केवळ एका आमदार व स्वत:चा असलेला संपर्क याच्या जोरावर कोल्हे दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फटाके वाजवून व एकमेकांना लाडू भरवून जल्लोष केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील फेरीनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे 

पहिली फेरी ६,००० मतांची आघाडी, दुसरी फेरी ९,५५३, तिसरी फेरी ११,१११, चौथी फेरी १८,६७४, पाचवी फेरी २५,०८८, सहावी फेरी २७,०३३, सातवी फेरी ३३,१९४, आठवी फेरी ३६,८१५, नववी फेरी ४४,०६८, दहावी फेरी ४९,७७०, अकरावी फेरी ५३,९४९, बारावी फेरी ५२,५४२, तेरावी फेरी ५५,९४१, चौदावी फेरी ६५,०२५, पंधरावी फेरी ७२,५२५, सोळावी फेरी ७१,९८२, सतरावी फेरी ७६,५८३, अठरावी फेरी ८३,०९३, एकोणिसावी फेरी ९२,६४९, विसावी फेरी १,०४,८७५, एकविसावी फेरी १,१४,८५५, बाविसावी फेरी १,२०,१९४, तेविसावी फेरी १,२६,६५८, चोविसावी फेरी १,३३,७६७, पंचविसावी फेरी २,३६,००५, सव्विसावी फेरी १,३७,४३६, सत्ताविसावी फेरी १,३९,११६, अंतिम फेरीत १,४१,०१५ मतांची आघाडी घेत खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धोबीपछाड देत त्यांचा पराभव केला आहे.

शिरूरमधील जय-पराजयाची कारणे काय?

अमोल कोल्हेंचा विजय कशामुळे?

- शरद पवार यांना असलेली सहानुभूती- शिवसेना, कॉंग्रेस (आय) पाठिंबा- संसदेतील भाषणे, कांदा प्रश्न, संसदरत्न पुरस्कार- छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची भूमिका आणि अभिनेता म्हणून मिळालेला प्रतिसाद- तडजाेडीच्या राजकारणामुळे सत्ताधारी आमदारांचे कार्यकर्ते आले शरद पवार गटात

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव का झाला?

- शिवसेनेतून दोन वेळा पक्षांतर- राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) कार्यकर्त्यांची उमेदवारीवर नाराजी- निष्ठावान कार्यकर्त्यांचा अभाव, दिलीप वळसे पाटील यांचा प्रचारात नसलेला सहभाग- निवडून येण्याचा अतिआत्मविश्वास- मित्रपक्षांची अपेक्षित ताकद न मिळणे.

टॅग्स :Puneपुणेshirur-pcशिरूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव