शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस...'त्या' चार चिठ्ठ्या लिहीत शिरीष महाराजांनी संपवलं जीवन

By नारायण बडगुजर | Updated: February 5, 2025 20:20 IST

देहूतील घरात आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

-नारायण बडगुजरपिंपरी : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी देहूतील घरात आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

पहिली सुसाइड नोट : प्रिय आकाश, मनीष, अक्षय, अजय आणि सर्वच मित्रांनो....

खरं तर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसाने मदत मागणे चूकच. पण कृपा करून आई-वडिलांना सांभाळा. चांगलं स्थळ पाहून दीदीचं लग्न लावून द्या. माझ्या डोक्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे. तेवढा कर्जाचा डोंगर आई-वडिलांच्या डोक्यावरून उतरवा. कोणाचे किती रुपये आहेत, हे वडिलांना माहिती आहे, तरीसुद्धा मुंबई सिंघवी- १७ लाख रुपये, बचतगट - ४ लाख रुपये, सोने तारण - २ लाख २५ हजार रुपये, गाडी- ७ लाख रुपये, किरकोळ देणेदारी - ८० हजार रुपये आहे. यातील गाडी विकून ती बाकी संपेल. त्यानंतर २५ लाखांचे कर्ज उरते. तुम्ही सर्वांनी थोडी-थोडी मदत करून आई-वडिलांना जपा. तुम्हाला वाटत असेल, मी हे सहज फेडू शकलो असतो. पण आता लढण्याची ताकद नाही. मला माफ करा.आणि हो आमची नवरीबाई.. तिची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त करून चाललोय. खूप गोड आहे प्रियांका. मला तिला कधी वेळच देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा पाहा अन्यथा ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो...- तुमचा शिऱ्या. 

दुसरी सुसाइड नोट : प्रिय बाळा आणि सर्व परिवार...

खूप कष्ट करा. आपली इको सिस्टीम उभी करा. मला माफ करा. थांबू नका. लढत राहा. विजय आपला नक्कीच आहे. स्वत:ला जपा. अधूनमधून वडिलांकडे लक्ष द्या. आयुष्याची इतिकर्तव्यता संपली समजून पूर्णविराम देत आहे. 

तिसरी सुसाइड नोट : माझी लाडाची पिनू, प्रियांका...

खरं तर तुझा आता कुठं हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. माफ कर. आयुष्यात सर्वांत जास्त अपराधी मी कोणाचा असेल तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही.

माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे, तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय.

कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. तू खूप गोड आहेस. नि:स्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल; पण जप स्वत:ला. एवढा काळ थांबलीस. आता मीच नसेल त्यामुळे थांबू नको. पुढे जा. खूप मोठी हो. आणि हो खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम घे. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या. मला माफ कर...

तुझाच अहो..- शिरीष मोरे. 

चौथी सुसाइड नोट : प्रिय मम्मी, पप्पा, दीदी...

काय लिहू... वयाच्या ३० वर्षांपर्यंत आयुष्यात जे जे करायचं म्हटलं, त्या सगळ्यात तुम्ही पाठीशी उभे राहिले. जे मिळवण्यासाठी कितीतरी वर्षे लागतात, ते तुमच्या पाठिंब्यामुळे काही वर्षांतच मिळवलं. तुमच्यामुळेच इथवर पोहोचलो. माझ्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीच मान खाली घालावी लागली नाही. एवढं सुंदर जगलो. मला जन्म दिलात, एवढं घडवलंत. पाठीशी उभे राहिलात. पण जेव्हा मी तुमच्यासाठी उभं राहिलं पाहिजे, नेमका तेव्हाच तुमचा हात सोडून जातोय. कधी-कधी सर्व मिळवूनसुद्धा माणूस युद्ध हरतोच. मीही थांबत आहे. याचा दोष सर्वस्वी माझाच आहे. तुम्हाला एकटं टाकून चाललोय. मला माफ करा...

- तुमचाच पप्प्या.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक