श्री छत्रपती स्वाभिमानी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिंगाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:14 IST2021-08-13T04:14:29+5:302021-08-13T04:14:29+5:30
अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने तानाजी शिंदे यांनी अध्यक्षपदाचा, तर सुमन आगलावे यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्या रिक्त जागेवर ...

श्री छत्रपती स्वाभिमानी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिंगाडे
अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने तानाजी शिंदे यांनी अध्यक्षपदाचा, तर सुमन आगलावे यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्या रिक्त जागेवर नुकतीच इंदापूरचे सहायक निबंधक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी शिंगाडे, तर उपाध्यक्ष पदासाठी घुले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर अध्यक्ष शिंगाडे व उपाध्यक्ष घुले म्हणाले की, सभासदांच्या हितासाठी सर्वांना सामावून संस्थेच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने काम करू.
या वेळी विविध पदाधिकारी यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थापक अध्यक्ष भागवत घुले, गुणवंत वाघमोडे, सखाराम गावडे, तानाजी शिंदे,हरिभाऊ काटे, अशोक देवकर, प्रकाश कोळेकर, हरिश्चंद्र करे, भगवान वायसे, संजय भोसले, अशोक माने, संजय वाघमोडे, माया चव्हाण, सुमन आगलावे उपस्थित होते.
श्री छत्रपती स्वाभिमानी पंतसंस्थेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करताना पदाधिकारी.
१२०८२०२१-बारामती-०८