शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

महापालिकेच्या शाळांत ‘शिपाई’च क्रीडा शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 03:00 IST

२२ पदे रिक्त : सध्या एकही क्रीडा शिक्षक नाही; क्रीडा निकेतनवर कोट्यवधींचा खर्च

पुणे : शहरामध्ये आॅलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी उत्कृष्ट सुविधा व तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून क्रीडा निकेतनच्या शाळा सुरु केल्या. परंतु महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मुळे क्रीडा शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नसून, सध्या शाळांतील ‘शिपाई’च क्रीडा शिक्षक झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शहरातील खेळांडूना स्थानिक पातळीवर खेळासाठी उत्कृष्ट सुविधा व तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरामध्ये तीन अनिवासी क्रीडा निकेतन सुरु करण्यात आली. पुणे शहरामध्ये चांगल्या दर्जाचे खेळांडू तयार होण्यासाठी महापालिकेच्या वतीने दर वर्षी या क्रीडा निकेतन शाळांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. या क्रीडा निकेतनच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत नाष्टा, जेवण, दूध, फळे उपलब्ध करुन दिली जातात. या क्रीडा निकेतनच्या शाळांमध्ये त्याच दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने मानधनावर क्रीडा शिक्षकांची नियुक्ती केली जाते. यंदाचे शैक्षणिक वर्षे सुरु होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप मानधनावर क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या चार क्रीडा निकेतन शाळांसाठी २२ क्रीडा शिक्षकांची गरज असून, गेल्या तीन महिन्यांपासून एकही क्रीडा शिक्षक उपलब्ध नाही. यामुळे शाळांमधील शिपाईच क्रीडा शिक्षकांची भूमिका पार पडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत मंगळवारीझालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वच सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. हा प्रकार समोर आल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी तातडीने क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.क्रीडा धोरण कागदावरचशहरामध्ये क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण आवश्यक आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने सन २०१३ क्रीडा धोरण जाहीर केले.शहराचे स्वतंत्र क्रीडा धोरण करणारी देशातील पहिली महापालिका असा टिमका मिरवणा-या पुण्याचे क्रीडा धोरण प्रत्यक्ष केवळ कागदावर राहीले आहे. आता पुन्हा नव्याने सुधारित क्रीडा धोरण २०१८ निश्चित करण्यात आले असून, क्रीडा समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे.महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळाशाळेचे नाव विद्यार्थी संख्या प्रशिक्षणखाशाबा जाधव क्रीडा १८६ कबड्डी, खो-खो,निकेतन, सिंहगड रोड मल्लखांब, योग, कुस्तीसंचिन तेंडुलकर क्रीडा २२८ हॅन्डबॉल, थ्रोबॉल, योगा,निकेतन, हडपसर मल्लखांब, कुस्ती, अ‍ॅथलेटिक्सक्रीडा निकेतन शाळा, ११० बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, येरवडा योग, कुस्ती

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका