शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

रस्त्यावरील मुलांसाठी निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 3:22 AM

निराधार मुलांसाठी शहरात काम करणाºया अनेक जुन्या संस्थांना डावलून एका खासगी कंपनीच्या निवारा प्रकल्पासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बुधवारी मान्यता दिली.

पुणे : निराधार मुलांसाठी शहरात काम करणाºया अनेक जुन्या संस्थांना डावलून एका खासगी कंपनीच्या निवारा प्रकल्पासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बुधवारी मान्यता दिली. तब्बल १० कोटी रुपयांचा निधी, यासाठी राखीव ठेवण्यात आला असून संबंधित संस्थेला महापालिकेच्या वापरात नसलेल्या शाळांच्या इमारतीही दुरुस्त करून दिल्या जाणार आहेत.प्रशासनाच्या वतीने हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. स्थायी समितीनेही त्याला मान्यता दिल्यानंतर तो सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला. शहरातील रस्त्यावर राहणाºयातसेच कुटुंबासाठी काम करणाºया सहा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी ही संस्था दिवसरात्र निवारा, असा प्रकल्प सुरू करणार आहे. महापालिकेचा समाज विकास विभाग, भवन रचना विभाग त्यांना साह्य करतील. दोन खासगी संस्थांनी महापालिकेला हा प्रस्ताव दिला होता. त्यातील एक संस्था दिल्ली येथील एका वरिष्ठ निवृत्त अधिकारी महिलेशी संबंधित असून त्याच संस्थेने शहरात सर्वेक्षण करून काही हजार मुले निराधार व रस्त्यावर राहत असल्याचा अहवाल प्रशासनाला दिला होता.त्या अहवालावर आधारित हा निवारा प्रकल्प प्रशासनाने तयार केला आहे. महापालिकेच्या अनेक शाळा इमारतींचा यासाठी वापर केला जाईल. तिथेच या मुलांसाठी शाळा व निवारा सुरू करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी या दोन संस्था पार पाडतील. त्यासाठी त्यांना महापालिका साह्य करेल. यात राज्य सरकारकडून निधी मिळणार आहे; मात्र तो मिळेपर्यंत सर्व खर्च महापालिका करणार आहे.शहरात हे काम करणाºया अनेक जुन्या संस्था आहेत. जनसेवा फाउंडेशन ही संस्था अशा तब्बल ५०० मुलांसाठी स्वखर्चाने शाळा चालवते.त्यांच्यासाठी निवारा म्हणून इमारत करण्याचा संस्थेचा प्रस्ताव निधीअभावी अपुरा राहिला आहे व महापालिका त्यांना मदत करण्याचे सोडून खासगी संस्थांना कोट्यवधी रुपयांची मालमत्ता देत आहे. या संस्थांमध्ये त्याबद्दल रोष आहे.