शेळगावला सात दुकाने फोडून ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:10 IST2021-09-03T04:10:49+5:302021-09-03T04:10:49+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी पहाटे व्यायाम करणाऱ्या नागरिकांना मुख्य चौकातील दुकाने फोडल्याचे निदर्शनास आले. यामध्ये ...

In Shelgaon, seven shops were vandalized and looted | शेळगावला सात दुकाने फोडून ऐवज लंपास

शेळगावला सात दुकाने फोडून ऐवज लंपास

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी पहाटे व्यायाम करणाऱ्या नागरिकांना मुख्य चौकातील दुकाने फोडल्याचे निदर्शनास आले. यामध्ये राहुल जाधव यांच्या हार्डवेअरच्या दुकानातील अंदाजे २५ ते ३० हजार रोख रक्कम, रॉयल इंटरप्रायजेस दुकानातील अंदाजे ७ ते ८ हजार रोख रकमेसह सीसीटीव्हीची मशीन व अन्य साहित्य घेऊन गेले तसेच नवनाथ पवार यांच्या मुक्ताई फुट वेअर ॲन्ड जनरल स्टोअर्स दुकानातील २२ रोखसह साहित्य तसेच विशाल किराणा दुकानातील अंदाजे ७ हजारांहून अधिक रक्कम चोरली असून एक टपरी, एक सलून व एक ड्रायक्लिनचे दुकान फोडले आहे. सलून दुकानात चोरी करताना एक चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

दरम्यान, शेळगाव ग्रामपंचायत प्रशासनाने गावात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्य चौकात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु मागील काही महिन्यांपासून काही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Web Title: In Shelgaon, seven shops were vandalized and looted