शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’च्या डोक्यावरचा हंडा कधी उतरणार!

By admin | Updated: March 8, 2017 04:58 IST

खेड तालुक्यातील कारकुडीची उगलेवाडी... उभ्या डोंगरकड्यावर हजारो फूट उंचीवर दाट जंगलात वसलेली आदिवासी वाडी. या वस्तीला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने

- अयाज तांबोळी,  डेहणेखेड तालुक्यातील कारकुडीची उगलेवाडी... उभ्या डोंगरकड्यावर हजारो फूट उंचीवर दाट जंगलात वसलेली आदिवासी वाडी. या वस्तीला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने, हंडाभर पाण्यासाठी दोन मैल जीवघेणी डोंगरकपारीतील खडतर पायपीट महिलांना करावी लागत आहे. ८० घरांचा उंबरा असलेली ३०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या वाडीत पाण्यासाठी ही परिस्थिती आहे, तर इतर सुविधांचा मागमूसही नाही. ‘पाणी म्हणजेच जीवन आहे’, याचा जीवघेणा प्रत्यय उगलेवाडीला गेल्याशिवाय कळत नाही. हंडाभर पाण्यासाठी दररोज मरणयातना सहन करण्याचे दुर्भाग्यच त्यांच्या नशिबी आले आहे. येथील महिलांना पहाटेपासूनच पाण्याच्या शोधार्थ पायपीट करावी लागत आहे. उगलेवाडीतील चालू असलेला रस्तासुद्धा ठेकेदाराने उखडून टाकला आहे. गेली दोन महिने काम बंद करून ठेकेदार गेला आहे. त्यामुळे डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा घेऊन चालताना फार त्रास होतो. वस्तीपासून दोन मैल अंतरावर डोंगराच्या उताराने खाली दरीत उतरून पाझराचे पाणी आहे. फुटलेल्या पाझराच्या थेंब थेंब पाण्याची साठवणूक करून, पाणी भरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हंडाभर पाण्याचे मोल किती आहे, हे त्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. पाण्यासाठी डोळ्यांत तेल घालून त्यांना कडे उतरावे लागत आहे. पावसाळ्यात हाच रस्ता असल्याने अनेक वृद्ध महिला पाणी आणताना पडून कायमच्या जायबंदी झाल्या आहेत.वस्तीला पाण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून दिवस-रात्र २४ तास भटकंती करावी लागते. दोन हजार फूट डोंगर उतरून-चढून डोक्यावर हंडा घेऊन येणे फार त्रासदायक आहे. परंतु त्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याने पाणी शोधत फिरण्यावाचून गत्यंतर नसते. पहाटे चार वाजता पाण्यासाठी गेल्यावर ७ वाजता एक हंडा पाणी घरी येते. दिवसाला दोन खेपाच मारण्याइतकी शक्ती शरीरात शिल्लक राहते. अंधारात हातात रॉकेलचा पलिता घेऊन प्रकाशात अंधाराची पाऊलवाट तुडवत डोंगरातील कडेकपारी पार केल्या जातात. अति चढउतार असणाऱ्या डोंगरातील मुरमाड व दगडी पाऊलवाटेने रिकाम्या हातानेसुद्धा सहज चालता येत नाही. परंतु, अशा बिकट पाऊलवाटेवरून ३० ते ४० लिटर पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन चढावे लागते. गॅस इथे शोधूनही सापडणार नाही. रानातील सुक्या सरपणावर साव्याची नाही तर नाचणीची भाकरी भाजून खाणारा हा आदिवासी तसाही समाधानी आहे. परंतु पाण्याच्या एका घागरीसाठी तो घरच्या लक्ष्मीला, लेकीला रानोमाळ फिरताना पाहून मात्र हतबल झाला आहे. उगलेवाडीकरांचीच ही व्यथा आहे असे नाही, तर डोंगरावर राहणाऱ्या वीस-बावीस गावांत हीच परिस्थिती आहे.