निमगाव केतकी: येथील तरकारी वाहतुक करणाऱ्या पिक - अप ड्रायव्हर जादा पैसे मिळत असल्याने दररोज मुंबई या ठिकाणी तरकारी भाजीपाला घेऊन जात आहेत.मात्र, सध्या रोज मुंबईला जाणाऱ्या अशाच एका चालकाची परिसरात चर्चा रंगली आहे. हा चालक मुंबई हुन आल्यानंतर देखील होमकोरंटाइन होत नव्हता.या स्थितीत त्यांच्यापासुन आपल्या लहान बाळाच्या जीवास धोका निर्माण होण्याच्या भीतीने आक्रमक पत्नीने चालक पतीला सोडुन लहानबाळासह माहेरी गाठले आहे मुंबई - पुणे येथे तरकारी वाहतुक करणाऱ्या पासून कोरोनाचा प्रसार होऊन वस्तीवर व गावात हाहाकार माजण्याची भीती व्यक्त करत आहेत. निमगाव केतकी गाव हे डाळिंब, द्राक्षे, पेरु, तरकारी, भाजीपाल्यासाठी प्रसिद्धआहे. दररोज ३५ ते ४० पिकअप तरकारी दररोज लॉकडाऊनच्या काळात पण पुणे ,मुंबई , सोलापुर या भागात जातात. त्यामध्ये पिक - अप चालक देखील अपवाद ठरला नाही. कोरोना प्रतिबंधक नियमाकडे देखील त्या चालकाने दुर्लक्ष केले. पत्नी आणि कुटुंबाचा सल्ला ऐकला नाही. मात्र, पतीच्या पैशाच्या प्रेमापोटी आपल्याला आणि आपल्या लहानग्याला जीव गमवावा लागेल. ममत्व जागे झालेली पत्नी आक्रमक झाली.या पत्नीने घरात या विषयावर भांडण करुन माहेर गाठल्याचे समजते. सध्या मुंबई, पुणे, सोलापूर येथील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने या भागात तरकारी वाहतुक चालकाबाबत बाबत मनात भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे या दररोज वाहतूक करणाऱ्यांना क्वारंटाइन करण्याची मागणी केली होती. तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी पुणे, मुंबईहुन येणाऱ्यांना क्वारंटाइन करण्याचे आदेश काढले आहेत. हे आदेश फक्त बाहेरुन येणाऱ्या नागरिकांसाठीच आहेत.
दररोज मुंबईला वाहतुक करणाऱ्या ड्रायव्हर पतीला सोडुन पत्नीने गाठले माहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:46 IST
लहान बाळाला कोरोना संसर्ग होण्याच्या भीतीने आई आक्रमक
दररोज मुंबईला वाहतुक करणाऱ्या ड्रायव्हर पतीला सोडुन पत्नीने गाठले माहेर
ठळक मुद्देतहसिलदार सोनाली मेटकरी यांनी पुणे, मुंबईहुन येणाऱ्यांना क्वारंटाइन करण्याचे काढले आदेश