अखेर बाळासाठी ती परतली!
By Admin | Updated: March 29, 2017 02:29 IST2017-03-29T02:21:33+5:302017-03-29T02:29:48+5:30
बाळाचा मृतदेह वायसीएमच्या शवागारात ठेवून गायब झालेली माता अखेर चार दिवसांनी परतली. शवागारात ठेवलेल्या

अखेर बाळासाठी ती परतली!
पिंपरी : बाळाचा मृतदेह वायसीएमच्या शवागारात ठेवून गायब झालेली माता अखेर चार दिवसांनी परतली. शवागारात ठेवलेल्या बाळाची आई आपणच आहोत हे पटवून देऊन तिने मृतदेह ताब्यात घेतला. संत तुकारामनगर येथील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बाळाचे अंत्यसंस्कारही करण्यात आले. मुलगी जन्माला आली. ती नकोशी होती. म्हणून ती काळजावर दगड ठेवून निघून गेली नव्हती, तर गरिबीपुढे हतबल झालेल्या मिर्चना अश्फाक काळे हे त्या दुर्दैवी महिलेला एकापाठोपाठ एक आलेल्या संकटांशी सामना करावा लागला. तिच्या परत येण्याने एक निर्दयी माता असा तिच्याबद्दल पसरलेला गैरसमज दूर झाला.
२२ मार्चला या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आठव्या महिन्यात जन्माला आलेल्या बाळाची प्रकृती नाजूक होती. उपचारादरम्यान १२ व्या दिवशी बाळाने जीव सोडला. बाळ गेल्याचा धक्का बसला असतानाच सासूचे निधन झाल्याची खबर तिच्यापर्यंत आली. अवघ्या १२ दिवसांचे बाळ दगावले. हे दु:ख समोर होते. परंतु सासूचेही निधन झाले. काळजावर दगड ठेवून नाईलाजास्तव तिला बाळाला शवागारात ठेवून पतीसह तातडीने सासूच्या अंत्यसंस्कारासाठी जाणे भाग पडले. बाळाचे काय करायचे ते नंतर बघू असा विचार करून बाळाला शवागारात ठेवून त्यांनी तेथून काढता पाय घेतला. माता-पिता बाळाचा मृतदेह शवागारात ठेवून गेले, ते परतलेच नाहीत. त्यामुळे बाळाचे पुढे काय करायचे असा प्रश्न रुग्णालय व्यवस्थापनापुढे निर्माण झाला.
पोटच्या गोळ्याला शवागारात ठेवून परत रुग्णालयाकडे न फिरकल्याने ‘माता न तू वैरिणी’ अशी त्या महिलेबद्दल चर्चा होऊ लागली. मुलगी झाली, ती नकोशी होती म्हणून माता-पिता असे वागले, असे तर्क लावण्यात आले. प्रत्यक्षात अत्यंत गरिबीची परिस्थिती असलेल्या या दाम्पत्याला साताऱ्यातून पिंपरीला येण्यासाठी पैशाची जमवाजमव करण्यात ३ दिवसांचा अवधी गेला.
अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातील धामणगावची ही महिला अखेर गुढी पाडव्याच्या दिवशी भावाला घेऊन धावत पिंपरीत पोहोचली. बेवारस घोषित करून रुग्णालयाने मृतदेह ताब्यात द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. दरम्यानच्या कालखंडात अचानक बाळाची आई हजर झाली. (प्रतिनिधी)
बाळाची आई असल्याचे तिने पोलीस अािण रुग्णालय प्रशासनास पटवून दिले. त्यानंतर मृतदेह तिला ताब्यात मिळाला. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.