‘बॉडीगार्ड’ की शार्प शूटर्स
By Admin | Updated: June 28, 2014 22:41 IST2014-06-28T22:41:01+5:302014-06-28T22:41:01+5:30
भिरभिरती परंतु सावध नजर असलेले बॉडीगार्ड सध्या काही राजकारण्यांच्या व विशेषत: लॅंड माफियांच्या अवतीभोवती थांबलेले दिसतात.

‘बॉडीगार्ड’ की शार्प शूटर्स
>पुणो : व्यायाम करून कमावलेलं शरीर, तगडी शरीरयष्टी, अंगावर इस्त्रीची राखाडी रंगाची सफारी, भिरभिरती परंतु सावध नजर असलेले बॉडीगार्ड सध्या काही राजकारण्यांच्या व विशेषत: लॅंड माफियांच्या अवतीभोवती थांबलेले दिसतात. कंबरेला पिस्तूले लावून बॉडीगार्डच्या नावाखाली फिरणा:या या शार्प शूटर्सची सध्या चलती आहे. सहसा पोलिसांच्या नजरेत न येणा:या या बॉडीगार्डवर ‘चेक’ ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
बाबा बोडके टोळीचा गुन्हेगार आणि इस्टेट एजंट असलेल्या परशा जाधवचा ‘गेम’ जमिनीच्या वादातून करण्यात आला. कुख्यात अप्पा लोंढे टोळीचा बाळ्या चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी परशाला भरदिवसा गोळ्या घालून संपवला. त्या वेळी परशावर पहिली गोळी झाडणारा शर्मा नावाचा व्यक्ती हा बाळ्याचा सफारीमधला बॉडीगार्ड असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. तो मुळचा मध्य प्रदेशातील असल्याचेही समजते. पुण्याचे गुन्हेगारी जगत सध्या जमिनींच्या व्यवहारांवर आणि बिल्डर लॉबीच्या आशीर्वादावर पोसले जात आहे. जमिनीच्या व्यवहारांमधून मिळणारा पैसा या गुन्हेगारांच्या जिवावर उठला आहे. पूर्ववैमनस्य आणि व्यवहारातील नाराजी यामुळे कधी कोणाचा काटा निघेल याची शाश्वती नाही.
अशा वेळी मरणाच्या भितीने स्वत:चा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सोबत दहशतीसाठी या सफारीतल्या बॉडीगार्डचा वापर केला जात आहे. शहरातील डझनवारी गुन्हेगार आणि लॅंड माफिया असे बॉडीगार्ड पदरी ठेवून आहेत. हे बॉडीगार्ड उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार किंवा राजस्थानातून आणले जातात. कधी कधी गुन्हेगार स्वत:च्या ‘नेटवर्क’ चा वापर करुन त्यांना थेट बोलावून घेतात. तर कधी कधी एजन्सीज मार्फत कॉन्ट्रॅक्ट केले जाते. यातील बहुतांशी जणांकडे ‘वेपन’ लायसन्स नसतानाही पिस्तूले असतात.
एका बॉडीगार्डचा महिन्याचा पगार हा 3क् ते 4क् हजारांच्या आसपास असतो. कुणाकडे दोन बॉडीगार्ड असतात तर कुणाकडे चार ते सहा जण असतात. (प्रतिनिधी)
च्बॉडीगार्ड ठेवल्यानंतर त्यांची सविस्तर माहिती स्थानिक पोलिसांना देणो आवश्यक आहे. परंतु, अशी माहिती कोणीही देत नाही. त्यांचे वारंवार पोलीस व्हेरीफिकेशन होणो गरजेचे आहे. परंतु, आपल्या हद्दीतील गुन्हेगार कोणते बॉडीगार्ड वापरतात याची पोलिसांनाच खबर नसते.
च्या बॉडीगार्डचा पूर्वेतिहास, रेकॉर्ड तपासण्याची आवश्यकता आहे. तसेच या गुन्हेगारांच्या आर्थिक व्यवहारांवरही लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. या बॉडीगार्डना पोलिसांचा ‘चेक’ न राहिल्यामुळे सध्या गुन्हेगारांचे फावते आहे.