शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांचे भागभांडवल कर्जात वळते होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवड : कॅपिटल टू रिस्क असेट्स रेशो (सीआरएआर) नऊ टक्क्यांहून अधिक असलेल्या सहकारी बँकांना त्यांचे भागभांडवल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : कॅपिटल टू रिस्क असेट्स रेशो (सीआरएआर) नऊ टक्क्यांहून अधिक असलेल्या सहकारी बँकांना त्यांचे भागभांडवल परत करण्याचा अथवा कर्जात वळते करण्याचा पर्याय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देऊ केला आहे. त्याचा फायदा सहकारी बँकांमधील कर्जदारांना होणार आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांचे समभाग शेअरबाजाराशी निगडित असतात. तर सहकारी बँकांचे समभाग कर्जाशी संलग्न असतात. सहकारी बँंकांमधील कर्ज प्रकारानुसार कर्जाच्या अडीच ते तीन टक्के रक्कम समभाग म्हणून ठेवावी लागते. आरबीआयने समभागांवर लाभांश देण्यास मनाई केली आहे. तसेच, समभाग परतही देता येत नव्हते. त्यामुळे कर्जदारांबरोबर वादाचे प्रसंग घडत होते. म्हणून, नागरी सहकारी बँंक संघटनांकडून भागभांडवलाची रक्कम परत देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने ९ टक्क्यांहून अधिक सीआरएआर असलेल्या बँकांना जून २०२० पासून भागभांडवल रक्कम परत देण्यास हरकत नसल्याचा आदेश बुधवारी (दि. १३) काढला आहे.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते म्हणाले, पुरेसे तारण असलेल्या कर्ज रकमेच्या अडीच टक्के रक्कम भाग भांडवल म्हणून घेतली जाते. तर, विनातारण कर्जावर पाच टक्के रक्कम घेतली जाते. सहकारी बँकांचे समभाग कर्जाशी निगडित असतात. सध्या त्यांना लाभांश देता येत नाही. तसेच, रक्कम परत देता येत नव्हती. थकबाकीदार कर्जदार समभागाची रक्कम वळती करण्याची मागणी करीत होते. जर आमच्या रकमेवर व्याज मिळत नसेल, तर ती रक्कम अडकविण्यात काय फायदा असा सवाल उपस्थित केला जात होता. आता, आरबीआयच्या निर्णयामुळे कर्जदारांना रक्कम परत घेता येईल; अथवा कर्जात वळती करता येईल.