शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

अजितदादांच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो गायब; भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 19:35 IST

अजित पवारांनी माझ्या निवडीचे बॅनर लावले तर शरद पवारांचा देखील फोटो लावावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बारामतीतअजित पवार यांच्या सत्तानाट्याच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरबाजीने बारामतीकरांचे लक्ष वेधले. कारण या बॅनरवरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो गायब झाला आहे. हा गायब  झालेला फोटो बारामतीच्या बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी मानला जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्या निवडीचे बॅनर लावले तर शरद पवारांचा देखील फोटो लावावा,असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्यानंतर देखील बारामतीत ‘साहेबां’चा फोटो बॅनरवरुन गायब झाल्याचे दिसुन येते. अजिदादांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘दादां’चा फोटो लावत ‘आमचा विठुराया’ संबोधत बॅनर लावले. केवळ बॅनर लावुन कार्यकर्ते थांबले नाहीत. ‘एकच वादा अजितदादा’,‘अजितदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा दिल्या. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर बारामतीचे राजकारण चांगलेच ढवळुन निघाले आहे. बारामतीकरांनी पवार कुटुंबियांचे एकोप्याचे राजकारण सुरुवातीपासून पाहिले आहे. बारामतीच्या इतिहासात प्रथमच या कुटुंबियांचे एकमेकांच्या विरोधी राजकारण पाहण्याची वेळ बारामतीकरांवर आली आहे.   बारामतीत शरद पवारांची रणनीती कशी असेल, ज्या बारामतीच्या बळावर त्यांनी देशात ओळख निर्माण केली. त्यांच्यामुळे बारामती देशाच्या राजकारणात ओळखली जाते. त्या बारामतीचे राजकारण भविष्यात  कोणत्या दिशेने जाणार, या विचारानेच बारामतीकर धास्तावले आहेत. बारामतीत पवार कुटुंबीय एकत्र रहावेत, अशीच बहुतांश बारामतीकरांची इच्छा आहे.

...भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे अभिनंदन करणारे बॅनर लावले आहेत. भाजपचे पदाधिकारी सचिन साबळे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात हे बॅनर लावले आहेत. शिवाय भाजप बरोबर आल्याने काही भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत अजित पवारांचे स्वागत केले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवारBaramatiबारामती