पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वयाच्या ८१ वर्षीही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करून कोरानाग्रस्तांच्या कुटुंबियांना धीर देत आहेत. पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात उपचार घेत असलेल्या डॉ. आरती उदगीरकर यांची विचारपूस पवार यांनी केली आहे. त्यामुळे कोरोनासाठी काम करणाऱ्या कोविड योद्धयांचा आत्मविश्वास वाढला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात डॉ. आरती उदगीरकर उपचार घेत आहे. कोरानाने हिरावली बहिण भावाची भेट असे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर याची दखल शरद पवार यांनी घेतली आहे. पवार यांनी डॉ. आरती यांचे वडील नरसिंगराव उदगीरकर यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली.शरद पवार म्हणाले, ‘‘वायसीएमच्या डॉक्टरांबरोबर माझे बोलणे झाले आहे. डॉ. आरती यांना विश्रांती घ्यावी, लागेल. उपचारासाठी दोन तीन आठवडे लागतील. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडही उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. जोमाने कामास लागले आहेत.’’डॉ. आरती उदगीरकर म्हणाल्या, ‘‘माझी विचारपूस जेष्ठ नेते करतील, याबाबत मला कल्पना नव्हती. माझी आस्थेने चौकशी केली. पवार यांच्या फोननंतर आयुक्त श्रावण हर्डीकर, अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. एम. एस कराळे या डॉक्टरांनीही माझी विचारपूस केली. मनोबल वाढविण्याचे काम केले.’’आरतीचे बंधू उमेश उदगीकर म्हणाले, ‘‘वयाच्या ८१ शरद पवार हे तरूणाप्रमाणे काम करीत आहेत. त्यांच्या फोननंतर कुटुंबाला मानसिक बळ मिळाले आहे.’’
शरद पवारांचा माणुसकीचा फोन अन् कोरोनाबाधित महिला डॉक्टरसह कुटुंबियांना मिळाला आत्मविश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 21:19 IST
शरद पवारांच्या एका फोनने मानसिक बळ मिळाल्याची कुटुंबियांची भावना
शरद पवारांचा माणुसकीचा फोन अन् कोरोनाबाधित महिला डॉक्टरसह कुटुंबियांना मिळाला आत्मविश्वास
ठळक मुद्देकोरोनाबाधित महिला डॉक्टरवर सुरू आहे वायसीएममध्ये उपचार