शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

शरद पवारांनी उलगडला ‘सिंहासन’चा पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:42 AM

‘सिंहासन’ या अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो.

पुणे : ‘सिंहासन’ या अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. चित्रपटाच्या प्रभावी मांडणीसाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि निवासस्थान उपलब्ध करून देण्याची विनंती दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केली होती. त्यावर हे कसे अयोग्य असल्याची भलीमोठी नोट सामान्य प्रशासन विभागाने मला पाठवली. ती नोट नाकारून मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले. त्यातून अप्रतिम कलाकृती निर्माण झाली,अशी आठवण सांगत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नोट ‘ओव्हररूल्ड’ करण्यात माझा हातखंडा असल्याची मिस्किल टिप्पणी केली.ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथाली, अरुण साधू कुटुंबीय व मित्रमंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, आशय फिल्म क्लब, एआरडी एंटरटेनमेंट यांच्या वतीने साधू यांच्या कादंबरीवर आधारित ‘झिपऱ्या’ या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरूण साधू स्मृती प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे पत्रकारितेच्या व्यवसायाशी संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी विद्यार्थ्यांसह संशोधकांना पाठ्यवृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात पवार बोलत होते.याप्रसंगी राज्यसभा खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अरुण साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला बर्वे, एआरडी एंटरटेनमेंटच्या अश्विनी दरेकर, ग्रंथालीचे दिनकर गांगल आदी उपस्थित होते. यावेळी बुट पॉलिश करुन शिक्षण घेणाºया दोन विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देण्यात आली. ‘झिपºया’ चित्रपटाचा विशेष खेळही दाखविण्यात आला.केतकर यांनी पाठ्यवृत्ती योजनेमागची संकल्पना स्पष्ट केली. साधू यांच्या स्मृती जपण्यासाठी वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित असलेल्या, विज्ञानापासून सामाजिक विषयांपर्यंत संशोधन करणाºया विद्यार्थी, पत्रकारांना ही पाठ्यवृत्ती दिली जाईल.>ते कोणत्याही चौकटीत बसणारे साहित्यिक नव्हतेमराठी साहित्याचा दर्जा सर्वोत्तम कसा राहील, यासाठी अरुण साधू नेहमीच प्रयत्नशील राहिले. त्यांचे लिखाण वाचकांच्या अंत:करणाला भिडणारे होते. त्यांचे साहित्य आणि लिखाण इतर भाषांमध्येही गेले. छोट्याशा गावातून आलेले साधू मुंबईकर झाले आणि मुंबईच्या व्यथावेदनेतून आपल्यातील अस्वस्थतेला शब्दबद्ध केले, असेही पवार म्हणाले. ते म्हणाले, साधू यांनी मुंबईचे अस्वस्थ वास्तव, लोकलच्या परिसरात राहणाºया तरुणांची सुखदु:खं प्रभावीपणे मांडली. आपल्या लेखनातून मराठी साहित्याला उच्च दर्जा मिळवून दिला. ते कोणत्याही एका चौकटीत बसणारे साहित्यिक नव्हते.