शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

'आम्हाला विचार करावा लागेल’ असे पवार म्हणतात, तेव्हा...! निलेश लंकेची जोरदार टोलेबाजी

By अतुल चिंचली | Updated: June 10, 2025 16:59 IST

आपल्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला थेट दिल्लीच्या संसदेत पाठवण्याचे काम पवारच करू शकतात, त्यांची निर्णयक्षमता अफाट आहे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील व अन्य नेत्यांनीही जोरदार टोलेबाजी करत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्याना आगामी निवडणुकांसाठी तयार केले. यावेळी खासदार निलेश लंके यांनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली. ‘आम्हाला विचार करावा लागेल’ असे पवार म्हंटल्यावर समोरच्या व्यक्तीला ते काम करावेच लागते. असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. 

लंके म्हणाले, पवार यांचे ‘हसणे’ व पवार यांचे ‘शांत बसणे’ या दोन गोष्टी ज्याला कळतील त्याला आपला साष्टांग दंडवत. ‘आम्हाला विचार करावा लागेल’ असे पवार म्हणतात, त्यावेळी त्यांना हवे असलेले काम करण्याखेरीज समोरच्या व्यक्तीला दुसरा काही मार्गच रहात नाही. आपल्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला थेट दिल्लीच्या संसदेत पाठवण्याचे काम पवारच करू शकतात. त्यांची निर्णयक्षमता अफाट आहे. असा नेता आपल्याबरोबर आहे, आपल्याला त्यांचा सहवास मिळतो आहे यासारखी मोठी गोष्ट नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. 

पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अचानक आपण पदापासून बाजूला होत असल्याचे सूतोवाच केले. याबाबत बोलताना लंके म्हणाले, राष्ट्रवादी हा पक्ष नव्हे तर शरद पवारसुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचे कुटुंब आहे. कुटुंबात कुठलीही नाराजी नाही. पक्ष अखंडितपणे एक संघ आहे. राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांनी बांधलेले एक मंदिर आहे. मंदिराचा पाया म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे पायांना कधीही कळसाकडे पाहायचं नसतं.  

शरद पवार सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष बाबत घेतलेला निर्णय आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी मान्य करून पुढे चालत असतो. त्यांच्या निर्णयावर आपण विश्वास ठेवायचा असतो. त्यांच्याकडे राजकीय अनुभव मोठा आहे. अनेक राजकीय चढ-उतार त्यांनी पाहिलेले आहे. 55 वर्षातील वीस वर्ष शरद पवार सत्तेच्या विरोधात होते. त्यामुळे शरद पवार यांना राजकीय अनुभव मोठा आहे. अजित दादांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या का या प्रश्नावर लंके म्हणाले, आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणnilesh lankeनिलेश लंके