शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Sharad Pawar: लूट करणाऱ्या सत्ताधारी भाजप सरकारला खड्यासारखे बाजूला करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 20:37 IST

(bjp) भाजपरुपी संकटातून मुक्त करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत केवळ लूट करण्याचे काम सुरू आहे. लुट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करावे

ठळक मुद्देगॅस, पेट्रोल दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण

पिंपरी : केंद्राकडून (central government) कारखानदारी वाढविण्याचे धोरण दिसत नाही. कामगारांचे अधिकार संपवण्याची नवी निती येत आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढताहेत, महागाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. कारखानदारी अडचणीत सापडली आहे. शेतकरी, कामगारविरोधी धोरण आखणाऱ्या केंद्रातील भाजप (bjp)  सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजपरुपी संकटातून मुक्त करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत केवळ लूट करण्याचे काम सुरू आहे. लुट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

रहाटणी काळेवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार अण्णा बनसोडे, महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, वैशाली काळभोर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या विविध भागात जाण्याची आणि येथे येण्याची काही कारण होती. मी लोकांची सुख दु:ख समजून घेण्यासाठी आणि त्यांवर उपाय काढण्यासाठी आलो आहे. देशातील नागरिकांवर विविध संकटे आली आहे. गॅस, पेट्रोल दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण आहे. केंद्राचे सरकार हे महागाईचे सरकार आहे. कामगारहितविरोधी सरकार आहे. बेरोजगारी वाढत असून कामगारांना नोकरीची शाश्वती राहिली नाही. जीएसटीचे ३० हजार कोटी केंदा्रकडे पडून आहेत. राज्य सरकारला कोणतीही मदत करण्याची भूमिका दिसत नाही. राज्याला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे. ’’

''शहराची लूट करत आत्ता सत्ता त्यांच्याकडे आहे म्हणून ते काहीही गोष्टी करू शकतील. मात्र, हे फार काळ चालणार नाही. ते न चालण्याची परिस्थिती जनमाणसात निर्माण करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सत्तेचा दुरुपयोग कसा होतोय हे घराघरात सांगण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कार्यकत्र्यांनी जागृत व्हायला हवे असेही त्यांनी यावेळी सांगितले.'' 

भ्रष्टाचारमुक्त असणारी दहा कामे दाखवा

अमोल कोल्हे म्हणाले, ''देशातील परिस्थिती पहिली, तर शेतकरी, कामगार वर्गांचा आवाज दडपला जात आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपाने भ्रष्टाचारमुक्त असणारी दहा कामे दाखवा, आम्ही पुन्हा शहरात येणार नाही. शहराचे दोन हिस्से कोणी केले. नक्की मक्तेदारी कुणाची आहे. २०१७ च्या  महापालिका निवडणूकीपूर्वी आश्वासनांचा पाऊस पडला होता. ती गाजराची शेती होती, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.’’

पदे देऊनही अपयश आले, याचे आत्मपरिक्षण करा

दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘‘मोदींनी भ्रष्टाचार मुक्त, महागाई मुक्त स्वप्नांना दाखवलं होते, आता देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. कोरोनाच्या संकटात, वादळात केंद्राने मदतीचा हात आखडता घेतला. या शहरातील अनेकांना मंत्री, महापौर केले, संधी दिली तरीही गेल्या वेळी महापालिका का हातातून गेली. याचे आत्मपरीक्षण करायला हवं.’’

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार