शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

पवार आडनावाच्या मागे उभे राहा; अजितदादांच्या गुगलीवर शरद पवारांनी दिलेल्या उत्तराने पिकला हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 18:45 IST

सुप्रिया सुळे याच मूळ पवार असल्याचं सुचवत शरद पवारांनी दिलेल्या हटके उत्तराने पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकला.

Pune Sharad Pawar PC ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे इथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील मेळाव्यात केलेल्या वक्तव्यांचाही समाचार घेतला. "अजित पवार यांनी म्हटलं की बारामतीकरांनी पवारांच्या पाठिशी उभं राहायला हवं. यात चूक काय आहे? दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार," असं म्हणत सुप्रिया सुळे याच मूळ पवार असल्याचं शरद पवारांनी सुचवल्याने पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकला.

बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना अजित पवार म्हणाले होते की, "तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात, त्यामुळे जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. त्यामुळे आपली परंपरा खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार नाही," असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शरद पवारांनी आज सुप्रिया सुळे याच मूळ पवार असून सुनेत्रा पवार तर बाहेरून आल्या असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं.

भावंडांवर केलेल्या आरोपांनाही उत्तर

अजित पवार यांनी मेळाव्यातील आपल्या भाषणातून बंधू श्रीनिवास पवार आणि सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या पवार कुटुंबातील इतर भावंडांवर निशाणा साधला होता. "माझ्या निवडणुकीला कधी माझी भावंड फिरली नाहीत. आता गरागरा पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरत आहेत. तुमचा भाऊ होता त्यावेळी तुम्हाला फिरावेसे वाटलं नाही. पावसाळ्यात छत्र्या उगवल्याप्रमाणे या छत्र्या उगवल्यात," असा हल्लाबोल अजित पवारांनी केला होता. यावर पलटवार करत शरद पवारांनी म्हटलं की, "आधीच्या निवडणुकांमध्ये भावंडांनी प्रचार केला नाही, हे साफ खोटं आहे. निवडणूक माझी असो, अजितची असो किंवा सुप्रियाची असो...पवार कुटुंबातील व्यक्ती नेहमीच प्रचार करत आल्या आहेत," असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या विविध आरोपांना आज शरद पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं असून पवार कुटुंबातील हा राजकीय सामना आगामी काळात आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारbaramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Supriya Suleसुप्रिया सुळे