शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट शाळा बंद धोरण नको : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 16:31 IST

पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अमृत महोत्सव सांगता समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.

ठळक मुद्देमुख्याध्यापक संघाच्या कार्यक्रमात व्यक्त केली भूमिका पटसंख्येच्या निकषातही तारतम्य हवे, नवीन पिढी घडविण्यासाठी शिक्षकांना मुक्तपणे काम करता आले पाहिजे.

पुणे: ‘राज्यातील कमी पट संख्येच्या बाराशे ते तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पटसंख्या हा दुर्लक्षित करण्यासारखा भाग नाही. परंतु, पटसंख्या कुठे आणि कशी पाहावी याचे तारतम्य असले पाहिजे. शहरी भाग आणि उजाड, आदिवासी पाड्यांसाठी पटसंख्येचा एकच निकष लावला तर दुर्गम भागातील मुलांना शिक्षणच मिळणार नाही. त्यामुळे शाळा बंद धोरणात बदल झाला पाहिजे. नवी पिढी घडविण्याच्या दृष्टीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे ’, असे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी स्पष्ट केले. पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अमृत महोत्सव सांगता समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. कार्यक्रमास पुण्याचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत ,राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, पुणे विभागाचे प्रभारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले,राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, सचिव नंदकुमार सागर, विश्वस्त अरुण थोरात, हनुमंत कुबडे, शिवाजीराव किलकिले,आदिनाथ थोरात, भगवान शिंगाडे, मधुकर नाईक आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, ज्यांच्यासाठी देशात शिक्षणाचे सार्वत्रिकरण मान्य करण्यात आले आहे. त्यांना पटसंख्येच्या निकषामुळे शिक्षण घेता येणार नाही. पुणे,बारामती ,कोल्हापूर,सातारा आदी शहरांमध्ये पट संख्येची काळजी घ्यावी. परंतु,जो भाग उजाड ,दुर्गम आहे.आदिवासी पाड्यांवर लोकसंख्या कमी असते. त्यामुळे या ठिकाणी पटसंखेचा निकष लावता येणार नाही. शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि पटसंख्येचा निकष या दोन्ही बाबी विरोधाभासाच्या असून त्या योग्य नाही. त्यामुळे त्यात बदल करावा लागेल. मी यात राजकीय भूमिका घेणार नाही.मात्र,राज्याचे मुख्यमंत्री,अर्थमंत्री,शिक्षण मंत्री आणि मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल. मी स्वत: या बैठकीस उपस्थित राहील. त्यातून शिक्षणक्षेत्राचे,मुख्याध्यापकांचे व शिक्षकांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.ज्ञान दानाचे काम सोडून शिक्षकांवर शालाबाह्य कामांची जबाबदारी टाकणे योग्य नाही.शैक्षणिक गुणवत्ता आणि विस्ताराचा विचार करता नवीन पिढी घडविण्यासाठी शिक्षकांना मुक्तपणे काम करता आले पाहिजे. रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.भरती बंद करण्याचा निर्णय अतिरेकी असून नवी पिढी घडवण्याचा क्षेत्रातमध्ये खर्चावर काटकसर करणे योग्य नाही,असेही पवार म्हणाले.--------विधीमंडळातील चहा पानावर होत असलेल्या खर्चाचा उल्लेख करून शरद पवार म्हणाले, मी चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो.परंतु,चहापानावर एवढा खर्च होतो. हे मला एवढे जाणवले नाही. त्यामुळे प्रशासकीय खर्च कमी करून जेथे पिढी घडवायची आहे. त्या ठिकाणी खर्च करण्याची तयारी शासनाने दाखवली पाहिजे,. शरद पवार.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारeducationशैक्षणिकVinod Tawdeविनोद तावडे