शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत पवारांची फिल्डिंग: ५५ वर्षांनंतर काकडेंची भेट, तावरेंसोबतही बंद दाराआड चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 16:17 IST

Baramati Lok Sabha: अनेक दशके राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या काकडे कुटुंबियांची शरद पवार यांनी त्यांच्या निंबूत या गावी जाऊन भेट घेतली.

Sharad Pawar ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत आपली वेगळी राजकीय वाट निवडली आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहेत. कुटुंबातीलच उमेदवार विरोधात असल्याने शरद पवार यांना लेकीच्या विजयासाठी परिश्रम घ्यावे लागत असून पवारांनी बारामतीत बेरजेचं राजकारण सुरू केलं आहे. अनेक दशके राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या काकडे कुटुंबियांची शरद पवार यांनी त्यांच्या निंबूत या गावी जाऊन भेट घेतली. संभाजीराव काकडे यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही सांत्वनपर भेट घेतली. 

शरद पवार हे बारामतीच्या राजकारण सक्रिय झाल्यानंतर त्यांचा सुरुवातीच्या काळात काकडे कुटुंबाशीच राजकीय संघर्ष झाला होता. काकडे कुटुंबातील सदस्यांनी आतापर्यंत लोकसभेपासून अगदी जिल्हा परिषदांपर्यंत...विविध निवडणुकांमध्ये पवारांना आव्हान दिलं होतं. मात्र २०१८ मध्ये हे राजकीय वैर संपलं आणि पवार यांनी काकडे कुटुंबातील एका व्यक्तीला सोमेश्वर कारखान्याच्या संचालकपदावर संधी दिली. मात्र शरद पवार काकडे कुटुंबाच्या घरी गेले नव्हते. अखेर आज ५५ वर्षांनंतर पवार यांनी काकडे कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं.

चंद्रराव तावरेंसोबत बंद दाराआड चर्चा

काकडे कुटुंबासह तावरे कुटुंबाचीही पवारांशी राजकीय संघर्ष झाला आहे. आधी शरद पवारांसोबत काम करणारे चंद्रराव तावरे हे अजित पवारांच्या राजकीय एंट्रीनंतर शरद पवारांपासून १९९७ साली दूर झाले. त्यानंतर तावरे यांनी अजित पवारांविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत अपयश आलं होतं. असं असलं तरी बारामती परिसरात तावरे कुटुंबाचंही राजकीय वलंय आहे. अशा स्थितीत आज शरद पवार यांनी चंद्रराव तावरे यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी बंद दाराआड चर्चा झाली.

भेटीविषयी काय म्हणाले चंद्रराव तावरे?

चंद्रराव तावरे आणि शरद पवारांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली असली तरी या चर्चेचा तपशील देणं तावरे यांनी टाळलं आहे. कारण तावरे हे सध्या भाजपमध्ये सक्रिय असून महायुतीच्या उमेदवार असणाऱ्या सुनेत्रा पवार यांचं काम त्यांना करावं लागणारं आहे. "मी वेगळ्या पक्षात आहे, ते वेगळ्या पक्षात आहेत, कशाला आम्हाला मातीत घालता," असं पत्रकारांना उद्देशून चंद्रराव तावरे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbaramati-pcबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४