पदवीधरच्या निवडणुकीला आत्मविश्वासाने समोरे जा : शरद पवार

By Admin | Updated: May 31, 2014 22:10 IST2014-05-31T21:43:00+5:302014-05-31T22:10:07+5:30

ही निवडणूक रंगीत तालीम समजून विजयाच्या निर्धाराने व आत्मविश्वासाने समोरे जावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केेले.

Sharad Pawar: Meet the graduation election confidently | पदवीधरच्या निवडणुकीला आत्मविश्वासाने समोरे जा : शरद पवार

पदवीधरच्या निवडणुकीला आत्मविश्वासाने समोरे जा : शरद पवार

पुणे : लोकसभा निवडणुकीचा निकाल व आगामी विधानसभा निवडणुकीच्या मध्यवर्ती पदवीधर मतदार संघाची निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगीत तालीम समजून विजयाच्या निर्धाराने व आत्मविश्वासाने समोरे जावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केेले.
पश्चिम महाराष्ट्रातील पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांच्या प्रचारासाठी आढावा बैठक आज निसर्ग कार्यालयात झाली. त्यावेळी पवार यांनी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, विधानसभा सभापती दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, सारंग पाटील, सर्व खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदार संघातील विजय महत्वाचा असून, कार्यकर्त्यांना चांगला संदेश जाईल. प्रदेशाध्यक्षांनी मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांत जावून जिल्हा व तालुका अध्यक्षांसह मतदारांची भेट घ्यावी. विविध भागात दौरे करून कार्यकर्त्यांवर मतदारांना केंद्रापर्यंत नेहण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी, असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, येत्या २ जूनला राष्ट्रवादीचे उमेदवार पाटील हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar: Meet the graduation election confidently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.